Thursday, June 30, 2022

पोलीस पतीचे ‘काळे धंदे’, दुसरी तरुणी समजून स्वत:च्याच बायकोशी  

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंदूरमध्ये आपल्या रंगेल पतीचे काळे धंदे उघड करण्यासाठी एक अनोखा मार्ग पत्नीने अवलंबला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा पती हा स्वत: पोलीस कर्मचारी आहे.

पतीचा रंगेलपणा उघड करण्यासाठी पत्नीने प्रथम फेसबुकवर बनावट नावाने एक आयडी तयार केला. यानंतर नवऱ्याला तिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पतीने ही फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करताच

दोघांचं चॅटिंग देखील सुरू झालं. पोलीस कर्मचाऱ्याला असं वाटलं की, एखादी दुसरी मुलगीच त्याच्याशी प्रेमाच्या गुलूगुलू गप्प मारतेय. त्यामुळे त्याने चॅटिंगवर थेट Kiss आणि Sex ची मागणी केली.

पण त्यानंतर जेव्हा या चॅटिंगनंतर खरी बायकोच समोर आली तेव्हा पोलीस पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.इंदूरच्या सुखलिया येथील रहिवासी असलेल्या मनिषा चावंडचा विवाह सत्यम

बहल या तरुणाशी 2019 साली झाला होता. काही दिवस सत्यमने मनिषाला चांगली वागणूक दिली, मात्र काही दिवसातच त्याने तिचा छळ सुरू केला. मनिषाने केलेल्या आरोपानुसार,

सत्यम हा किरकोळ गोष्टीवरून पत्नीला अनेक तास बाथरूममध्ये कोंडून ठेवायचा. तसेच अनेकदा बेदम मारहाण देखील करायचा.अखेर वैतागलेल्या मनिषाने तिच्या आई-वडिलांकडे

याबाबत तक्रार केली, ज्यानंतर तिने पोलिसातही एफआयआर नोंदवली. 28 नोव्हेंबर 2020 रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पतीने घरात वर्तमानपत्रही

वाचू देत नसे, असे नमूद केले आहे. एवढेच नाही तर सत्यम हुंडा म्हणून सतत मोटारसायकलची मागणी करत होता. असाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीला अटक

करण्याचे आदेशही देण्यात आले होते. पण सध्या आरोपी पती जामिनावर बाहेर आहे आणि हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.माहेरी असताना पीडित मनिषाला पतीवर संशय आल्याने

तिने त्याला फेक फेसबुक आयडीने रिक्वेस्ट पाठवली. सोशल मीडियावर स्वत:ला सिंगल सांगणारा सत्यम आता त्या महिलेशी रोज बोलू लागला. दरम्यान, एके दिवशी फेसबुक चॅटवर

स्वत:च्या पत्नीला दुसरी तरुणी समजून पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याकडे चुंबन आणि सेक्सची मागणी केली. आता याच चॅटिंगचे स्क्रीन शॉट घेऊन पीडितेच्या पत्नीने न्यायालयात पुरावा म्हणून सादर केला आहे.

पीडितेच्या आरोपावरून इंदूर जिल्हा न्यायालयाने आरोपीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर सुनावणी करताना

न्यायालयाने सोमवारी पत्नीला खर्च म्हणून 2 लाख रुपये, तसेच दरमहा ७ हजार रुपये देण्याचे आदेश पतीला दिले आहे.वकील कृष्णकुमार कुन्हारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले

की, 2020 मध्ये पीडितेने तक्रार करून न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर जिल्हा न्यायालयाने दखल घेत पतीला दरमहा 7000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंतची ही थकीत किंमत 2 लाखांहून अधिक झाली आहे.

त्याचवेळी पतीचे सत्य उघड व्हावे, या उद्देशाने पीडित पत्नीने दुसरी मुलगी असल्याचे भासवून आपल्याच पतीशी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केलं. पत्नीने टाकलेल्या या जाळ्यात

पती अलगद सापडला. त्यामुळे आता पत्नी मनिषाने या सगळ्या प्रकरणात योग्य न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मदतीची याचना केली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!