Saturday, July 2, 2022

आता WhatsApp ग्रुपमध्ये जोडता येणाऱ्या मेम्बर्सची संख्या होणार तब्बल इतकी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्सना एक शानदार भेट देत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मेंबर्स जोडण्याची संख्या दुप्पट केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर आता एक नवीन अपडेट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे युजर्सना 512 मेंबर्स असलेला एक ग्रुप बनवता येईल. सध्या ही मर्यादा 256 मेंबर्स इतकी आहे आणि आता व्हॉट्सअ‍ॅप

ग्रुप चॅटमध्ये मेंबर्सची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.  या फीचरची घोषणा मे मध्ये करण्यात आली. तेव्हा ग्रुप चॅटमध्ये 2GB पर्यंतची फाईल शेयर,

मेसेज रिअ‍ॅक्शन आणि इतर अनेक फीचर्सची घोषणा करण्यात आली होती. यातील रिअ‍ॅक्शन्स आणि 2GB फाईल शेयरिंग हे फीचर्स अँड्रॉइड, आयओएस आणि डेस्कटॉपवरील सर्व युजर्ससाठी

उपलब्ध झाले आहेत. WAbetainfo च्या रिपोर्टनुसार ग्रुप चॅटमध्ये 512 पार्टिसिपेंट्स अ‍ॅड करण्याचं फिचर देखील रोलआउट झालं आहे.

नवीन फिचर आता अँड्रॉइड व्हॉट्सअ‍ॅप बीटा 2.22.3.1.10 आणि आयओएस व्हॉट्सअ‍ॅप बीटा 22.12.0.73 युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. तसेच आजपासून सर्व व्हॉट्सअ‍ॅप

युजर्स (नॉन-बीटा युजर्स) साठी देखील हे फिचर उपलब्ध होईल. सुरुवातीला 128 मेम्बर्स जोडण्याची सोय व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देण्यात आली होती, ती वाढवून 256 करण्यात आली होती.

आता ही संख्या दुप्पट करत 512 मेंबर्स व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जरी हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध झालं असलं तरी काही युजर्सना हे उशिरा मिळू शकतं.

त्यामुळे जर तुमचा एखाद्या ग्रुपमध्ये 512 मेम्बर्स जोडण्याचा प्रयत्न यशस्वी होत नसेल तर तुम्ही 24 तास वाट बघून पुन्हा प्रयत्न करू शकता. नवीन फिचर मिळवण्यासाठी अँड्रॉइड आणि आयओएस

अ‍ॅप स्टोरवर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप अपडेट चेक करा. अपडेट असल्यास अपडेट करून घ्या.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!