माय महाराष्ट्र न्यूज:यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर सोयाबीनला चांगला भावही मिळत
असल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा सोयाबीन पेरणीची गडबड करण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस चांगली होत असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी
पोषक वातावरण असले तरी अचानक पाऊस थांबण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते यासाठी कृषी आयुक्तांनी सूचना केल्या आहेत.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांच्या पेरणीबाबत घाई करु नये. यासाठी शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.
सोयाबीन बियाणांची पेरणी करतांना शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेले चांगले बियाणे वापरावे. प्रति हेक्टरी बियाणांचा दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर
आणण्यासाठी टोकन पदध्तीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15
किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. व नंतर त्यांची पेरणी करावी. तसेच बियाण्यांची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत
करण्याचे आवाहनही करण्यात देण्यात आले आहे.राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा
सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या
माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले.