Friday, July 1, 2022

राज्यसभा निवडणूक: महाराष्ट्र भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी, शिवसेनेच्या या उमेदवारांचा पराभव

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात विरोधात असलेल्या

भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. या उलट सत्ताधारी शिवसेनेच्या दोन पैकी एका उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेचे संजय पवार निवडणुकीत हरले. निवडणूक आयोगाने

जाहीर केलेल्या निकालानुसार महाराष्ट्रात भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. केंद्रीय

मंत्री पियूष गोयल आणि अनिल बोंडे या दोघांना प्रत्येकी ४८ तर धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली. काँग्रेसच्या इमरान प्रतापगढी यांना ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल

यांना ४३ मते मिळाली.शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. सेनेचे संजय पवार फक्त ३३ मते मिळवू शकले.मतदानानंतर भाजपने तीन मतांवर आक्षेप घेतला. यापैकी

शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत रद्द करण्यात आले. यासाठी नियमाचे उल्लंघन केल्याचे कारण देण्यात आले. तर काँग्रेसच्या यशोमती ठाकुर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड

या दोघांची मते वैध ठरविण्यात आली. महाविकास आघाडीचे आक्षेप फेटाळण्यात आले. राज्यसभेच्या ११ राज्यांतील ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यापैकी ४१ जागांवर

बिनविरोध निवड झाली. उर्वरित १६ जागांसाठी शुक्रवार १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान झाले. नंतर मतमोजणी झाली. यात भाजपच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील

प्रत्येकी ३ तर राजस्थानमधील एका उमेदवाराचा विजय झाला. हरयाणात भाजपच्या तिकिटावर एक उमेदवार विजयी झाला आणि भाजपचे समर्थन असलेला एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.

यामुळे १६ पैकी ९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे राजस्थानमध्ये तीन तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक असे पाच उमेदवार विजयी झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी

काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा महाराष्ट्रात विजय झाला.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!