माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 14 जून रोजी होत असलेल्या देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा
मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज व श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेट महंत रामगिरीजी
महाराज यांना देहू संस्थांच्या वतीने विशेष निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य व तुषार भोसले व या कार्यक्रमाचे उत्तर
महाराष्ट्राचे संयोजक बबन मुठे यांनी दिली.देहूच्या इतिहासात प्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे देहू – आळंदी परिसरात संत-महंत यामध्ये आनंदाचे वातावरण आहे व
यातच देवगड देवस्थान चे महंत भास्करगिरी जी महाराज सरला बेट चे महंत रामगिरीजी महाराज यांना अशा मोठ्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या मंहताना विशेष निमंत्रित
केल्याने नगर जिल्ह्यात आनंद होत आहे नगर जिल्ह्यातील या दोन्ही महंतांची देहू संस्थान व भाजपा अध्यात्मिक आघाडीच्यावतीने उत्तर महाराष्ट्र संयोजक बबन मुठे यांनी भेट घेऊन
देहू येथील कार्यक्रमाची माहिती देऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे विनंती केली आहे.