Friday, July 1, 2022

वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा : अमृता फडणवीस

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा. जर्मनीमधे तर त्याकडे आदराने बघितले जाते.

मी त्याच्या पाठीमागे आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला

आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात अमृता फडणवीस बोलत होत्या.

समाजात वेश्याव्यवसायामुळे संतुलन राखलं जात आहे. वेश्या व्यवसाय हा पुरातन काळापासून आहे. समाजाचं संतुलन राखण्याचं काम करताना तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे.

तुम्ही जे काम करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. पैशासाठी आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील गर्वाचं काम करत आहात, अशा शब्दांत त्यांना पाठिंबा दर्शवला.

तुमच्या या व्यवसायाला सर्वौच्च न्यायालयाचा देखील पाठिंबा आहे.तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही सगळे आहोत. तुम्ही कोणत्याही कराणामुळे या व्यवसायात पडल्या असाल तरी देखील

तुम्ही सगळ्या या समाजाचा अविभाज्य भाग आहात. जर तुमच्यावर काही वाईट प्रसंग आला तर तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, अशा विश्वास त्यांनी महिलांना दिला.

आपल्या मुलींना काय करायचं आहे. हे लक्षात घ्या. त्यांना सुरुवात देणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यांच्या शिक्षणाची सोय करणे देखील महत्वाचं आहे आणि स्वत:च्या आरोग्याकडे

लक्ष देणंसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. या व्यवसायामुळे अनेक रोगांची बाधा होऊ शकतो मात्र त्याकडे दुर्लक्ष करु नका. चांगल्या ट्रेनरची नेमणुक

करुन तुमच्यासाठी योगा सेशन ठेवेन, असंही यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!