माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र बोर्डाने 12वीचे निकाल जाहीर केले आहते त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 10वीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. परंतु हा
निकाल कधी जाहीर केला जाईल याबाबतच्या तारखेबद्दल राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र 15 जूनपर्यंत 10वी परीक्षेचे निकाल जाहीर
होण्याची शक्यता आहे. कारण बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालांमध्ये फारसे अंतर नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही अशी शक्यता आहे.
निकालाची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थी mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला स्कोअर तपासू शकतात.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
– mahahsscboard.in
– mahresult.nic.in
दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
येथे वेबसाइटवर तुम्हाला निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.यानंतर तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल.
यानतंर निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.तुम्ही हा निकाल डाउनलोड करा किंवा सेव्ह करू शकता.निकाल जाहीर करताना अनेकदा सर्व्हर डाऊन झाल्याचे किंवा वेबसाइट
क्रॅश झाल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी इंटरनेटशिवायही फोनवरून आपला निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम
मेसेज अॅप ओपन करावे लागेल. यानंतर MHSSC आसन क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर स्पेस देऊन 57766 या क्रमांकावर संदेश पाठवा. काही वेळाने तुम्हाला मेसेजद्वारे निकाल प्राप्त होईल.