नेवासा
तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील खंडु बाबासाहेब पाटील यांनी आपल्या कन्येच्या लग्नात ३ प्राथमिक शाळा व ३ आश्रमशाळा यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची रोख देणगी देऊन समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
भेंडा येथील खंडू पाटील यांची कन्या चि. सौ.का.
काजल व रांजणगाव देवी येथील गोवर्धन लोखंडे यांचे चिरंजीव चि. सचिन यांचा विवाह नुकताच भेंडा येथे पार पडला. या वेळी पाटीलकुटुंबियांनी लग्न समारंभात कुणालाही सत्कार-शाल-फेटा, साडी-चोळी, वस्तु भेट न देता सौंदाळा, रांजणगावदेवी , भेंडा बुद्रुक जिल्हा परीषद प्राथमिक शाळा व शिरुरकासार तालुक्यातील मातोरी येथील सेवातिर्थ शैक्षणिक आश्रम, तरवडी येथील मुकुंदराव पाटील स्मारक समिती,तसेच नवजीवन संगोपन केंद्र आष्टी यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे.
सौ.जयाताई गडाख, काशिनाथ नवले,दिनकर गर्जे, तुकाराम मिसाळ, डॉ,शिवाजी शिंदे,शरद आरगडे यांच्या हस्ते सदरची देणगी संधितांना देण्यात आली.