माय महाराष्ट्र न्यूज:राज्याच्या विविध भागात पावसानं हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग येणार आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी
पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये असं
आवाहन तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केलं आहे. राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर राज्यातील बहुतांश भागात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे.
पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती, त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय
कुठेही शेतकर्यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे मत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तथा व्यवस्थापन तज्ञ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे
गजानन गडदे व्यक्त केलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं जे आज
परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये असे आवाहन गजानन गडदे यांनी केलं आहे.पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतातील जमिनीची ओल तपासावी. ती
ओल जर एक वीतभर गेली असेल तर पेरणी करण्यास काही हरकत नसल्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. वितभर ओल गेल्यास पेरणी करायला काही अडचण नाही,
त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकासन होणार नसल्याचे डख म्हणाले. बियाणे चांगले वापरा, विद्यापीठानं सांगितलेलं बियाणे वापरा असा सल्लाही डख यांनी दिला.