माय महाराष्ट्र न्यूज:देशात खतांच्या किंमती भरमसाठ वाढत आहेत. मागच्या तीन वर्षांत खतांच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाल्याने
रासायनिक खते शेतीसाठी वापरने कठीण झाले आहे. दरम्यान शेतकऱ्याला सर्वात जास्त खतांमध्ये युरिया लागत असतो. पंरतु युरियाचा काही प्रमाणात तुटवडा होत असल्याने शेतकऱ्यांना
तो ही मिळत नसतो. यावर इफ्कोच्या गुजरातमधील कंपनीने लिक्विड युरिया काढला आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडने (इफ्को) गुजरातमधील कलोल येथे देशातील
पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प उभारला आहे. या युरियाची अर्धा लिटरची बाटली पारंपरिक युरियाच्या एका पोत्याएवढे पोषक तत्त्वे देतो. पीक उत्पादनासाठी फायदेशीर आणि शेतकऱ्यांच्या
उत्पन्नात वाढ होईल असे नॅनो युरिया देशातील कृषी क्षेत्राचा कायापालट करू शकते.नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक युरियाच्या घटकास
नॅनो युरिया असे म्हटले जाते. पारंपरिक युरियाला नॅनो युरिया हा पर्याय होऊ शकेल आणि 50 टक्क्यांनी युरियाचा वापर कमी करू शकेल. नॅनो लिक्विड युरिया हे पूर्णपणे भारताने विकसित केलेले उत्पादन आहे.
द्रवरूप नॅनो युरिया दोन टप्प्यांत थेट पिकांच्या पानांवर फवारता येणार आहे. पिकांना पूर्वीसारखे जमिनीतून युरिया पोहोचविण्याची गरज उरणार नाही.
द्रवरूपातील अल्ट्रा स्मॉल पार्टिकल्स पानांच्या माध्यमातून जमिनीत शोषले जातात.