माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
राहाता मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुक थोरात आणि कोल्हे पॅनलने मिळवला आहे.विखे पाटलांच्या ताब्यात असलेली सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या कोल्हे गटाने आघाडी केली होती. यामुळे विखे प्रणित जनसेवा मंडळ पॅनलला मोठा धक्का बसला आहे.
एकूण 19 जागापैकी 8 जागा जिंकत थोरात आणि कोल्हे पॅनलने ही विजय मिळवला आहे. ऊस उत्पादक गट राहतामध्ये थोरात गटाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहे.बाकी निकालांची आकडेवारी अजून प्राप्त होत आहे.पण थोरात आणि कोल्हे पॅनलचे बहुतांश उमेदवार आघाडीवर आहे.
ब वर्गातील विखे गटाचे ज्ञानदेव बाजीराव चोळके १५ मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी कोल्हे गटाचे सुधाकर जाधव यांचा पराभव केला. चोळके यांना ४४ मते पडले असून जाधव यांना २९ मते मिळाली. एकूण ७५ मतदान या मतदार संघात झाले होते. त्यापैकी दोन मते अवैध ठरली. ७३ मते वैद्य ठरली.
राहाता गटात ही थोरात कोल्हे गटाने बाजी मारली. या गटात थोरात कोल्हे गटाचे गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष नारायणराव कार्ले हे विजयी झाले. त्यांना 3906 मते मिळाली. याच गटाचे संपत कचरू हिंगे हेही विजयी झाले. त्यांना 3688 मते मिळाली.
गंगाधर पांडुरंग डांगे हे 3816 मते मिळवून विजयी झाले तर विखे गटाचे पुंजाजी दगडू गमे यांना 3273 मते मिळाली. उत्तम बळवंत डांगे यांना 3137 मते मिळाली. अनिल सोपान सदाफळ यांना 3247 मते मिळाली.
थोरात-कोल्हे गटाचे शिर्डी गटातील उमेदवार बाबासाहेब दादा डांगे ३८५९ व विजय भानुदास दंडवते ३ हजार ७८६ हे दोघे पहिल्या फेरीत ६५० ते ७०० मतांनी विजयी झाले आहेत. विखे पाटील गटाचे बाबासाहेब रामभाऊ डांगे यांना ३१५९ व बाबासाहेब परसराम मते यांना ३ हजार २७ मते मिळाली, दोघेही पराभूत झाले. शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शिंदे यांना भाऊसाहेब शिंदे यांना अवघी मते ४२ मिळाली.
दरम्यान गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत भाजपचे खासदार सुजय विखे भावूक झाले होते. कारखाना चालवताना कुटुंबाची होणारी ओढाताण आणि मुलगी विचारात असलेल्या प्रश्नाबाबत बोलताना खासदार सुजय विखे
यांना अश्रू अनावर झाले.मात्र निवडणूक निकालानंतर विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतील. कारण विखे पाटील कुणाची उधारी ठेवत नाहीत. आम्ही व्याजासह परत करतो असा इशारा सुजय विखे यांनी विरोधकांना दिला होता.