माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात एकीकडे भाजपा आणि शिवसेनेत छत्तीसचा आकडा असताना नगरमध्ये दोन्ही पक्षांचं गुळपीठ असल्याचं दिसून येतंय.
कारण ठरलंय भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांचं एक विधान. काहीही झालं तरी आपण शिवसेनेची साथ सोडणार नाही, असं विधान विखेंनी केलं आहे.
नगरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखे पाटील बोलत होते.नगरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात
भाजपा खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी विखे म्हणाले की, मी खासदार म्हणून निवडून येण्यात इथल्या शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच
गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधातही बोललो नाही. माझं आजही हेच मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा
प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरुन ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे ठाकरेंनी वेळीच सावध व्हावं.शिवसेनेला मदत करणार असल्याचं सांगत विखे म्हणाले की माझे काही कार्यकर्ते
शिवसेनेते गेले, पण त्याची मला खंत नाही. फक्त पारनेर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातलच भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा शिवसेनेवर
संकट येईळ, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींनी
माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. असं बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपाचा एकमेव खासदार आहे.