Saturday, July 2, 2022

भाषण पण झालं नाहीये. हे काय लगेच दांडके आले पुढे… अजितदादा पत्रकारांवर संतापले

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक आणि सडेतोड विधाने करत आपलं मत मांडत असतात.

अजित पवारांचा हा स्वभाव राजकीय नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. अगदी कामाच्या बाबतीतही अजित पवार हे सकाळी सहा वाजल्यापासून ऑन फिल्ड

दिसतात. बेधडक बोलणाऱ्या अजित पवारांचा पुन्हा एकदा अंदाज पहायला मिळाला. यावेळी अजित पवारांनी थेट पत्रकारांवर निशाणा साधला आहे. टेंभू योजनेतून माण- खटाव

तालुक्यातील 48 गावांना 2.5 टीएमसी पाणी आरक्षित केल्याबद्दल आज माण तालुक्यातील वरकुटे- मलवडी येथे कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला

उपमुख्यमंत्री अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी अजित पवारांना पत्रकारांनी गराडा घालण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांसमोर धाव घेत पत्रकार आपल्या प्रश्नांचा भडीमार करणार

तितक्यात अजित पवारांनी त्यांना रोखलं. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “तुम्हाला मराठी कळतंय का? मी आलोय, अजून इथं भाषण पण झालं नाहीये. हे काय लगेच दांडके

आले पुढं… मला काय बोलायचं आहे ते भाषणात बोलेन ना असे अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!