माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी
कांद्याच्या जास्तीत जास्त भावात 400 रुपयांनी वाढ होवून भाव दोन हजार रुपयांपर्यंत निघाले.घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारच्या लिलावासाठी एकूण 69 हजार 851 गोण्या
(37 हजार 720क्विंटल) इतकी आवक झाली. एक-दोन लॉटला 1700 ते 2000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1400 ते 1500 रुपये, मुक्कल भारी कांद्याला
1100 ते 1300 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1200रुपये, गोल्टी कांद्याला 400 ते 800 रुपये, जोड कांद्याला 200 ते 600 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
कांद्याच्या भावात सुधारणा होवू लागल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला असून शेतकर्यांच्या दरवाढीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील दोन महिन्यापासून कांद्याचे भाव कोसळले होते.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावात थोडी वाढझाल्याचे दिसून आले. पारनेर बाजार समितीमध्ये 7 ते 8 लॉटला सर्वाधिक प्रतिक्विंटल
1600 ते 2000 हजार रुपये भाव मिळाला. पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी 3 हजार 637 कांदा गोण्यांचीआवक झाली होती. एक नंबरच्या कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल 1100 ते 11500 रुपये
भाव मिळाला.पारनेर बाजार समितीमध्ये रविवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातील तीन दिवस कांद्याचा लिलाव होतो. रविवारी (12 जून) पारनेर बाजार समितीत कांद्यचे लिलाव झाले.
यावेळी सुमारे 3 हजार 637 कांदा गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यातील 7 ते 8 लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे 1600 ते 2000 रुपये भाव मिळाला.
एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते १५०० रुपये भाव मिळाला.दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 700 ते 1000 रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्याला म्हणजे जोड कांद्याला
प्रतिक्विंटल 200 ते 600 रुपये भाव मिळाला, अशी माहिती पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.