Thursday, June 30, 2022

विखे पाटलांचे खळबळजनक विधान म्हणाले फडणवीस-मोदींनी कारवाई केली तरी चालेल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याती कशीही स्थिती असली तरीही नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबतच राहणार आहोत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी

यांनी कारवाई केली तरी चालेल, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात केलं. या कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना उद्धव ठाकरे सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.पारनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त

कार्यक्रमात सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मी खासदार म्हणून निवडून येण्यात 50 टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे. याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या

तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्रीच्या विरोधात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत

गेले. मला याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. शिवसेनेवर

संकट येईल तेव्हा नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना मी एकटं सोडणार नाही, यावर देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली तरीही चालेल. असे बोलण्याची हिंमत

ठेवणारा मी एकमेव भाजप खासदार आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे सांगता येत नाही; असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं.राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता

सुजय विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच नगर जिल्ह्यातील शिवसेनेचं कौतुक केलं. ते म्हणाले, ‘ राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या

निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध रहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!