Saturday, July 2, 2022

नातवाने केले आजोबावर कोयत्याचे वार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

इतकी वर्ष झाली तरी मला मुलबाळ होत नाही आता तुमच्याकडे बघतोच असे म्हणून नातवाने चक्क आजोबावरच कोयत्याने सपासप वार करुन आजोबा गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. जखमी आजोबाला सोडविण्यासाठी आलेल्या चुलता, भाऊ आणि चुलतीवरही हल्ला केला असून त्यात ते देखील जखमी झाले आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नारायणवाडी (ता. नेवासा) येथे ही घटना घडली.

याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नारायणवाडी (ता. नेवासा) येथील गोकुळ मधुकर क्षीरसागर हा रविवारी रात्री साडेआठ
वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर कोयता हातात घेवून घराच्या दरवाज्यासमोर कोयता मारत होता. आजोबा जालिंदर मुकिंदा क्षीरसागर यांनी त्याला दरवाज्यावर कोयता का मारण्याचं कारण विचारलं? त्यावर आरोपी नातू गोकुळ म्हणाला की, मला लग्नाला इतकी वर्षे झाले तरी मुलबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच तुम्हाला मारुनच टाकतो असे म्हणून त्याने आजोबांच्या तोंडावर कोयत्याचे वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. गोकुळला रोखण्यासाठी त्याचे चुलते बाबासाहेब जालिंदर क्षीरसागर, चुलती स्वाती बाबासाहेब क्षीरसागर आणि चुलत भाऊ विश्वास बाबासाहेब क्षिरसागर हे कोयता गेले. मात्र गोकुळने त्यांच्यावर देखील कोयत्याने वार केला. त्यात ते जखमी झाले. जखमींवर नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहे. आरोपी गोकुळ क्षिरसागरला पोलिसांनी अटक केली आहे.
गोकुळ मधुकर क्षीरसागर याचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात कलम 307,324,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

*तीन दिवसांची पोलीस कोठडी…

नेवासा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तपासी अधिकारी ज्ञानेश्वर थोरात यांनी आरोपी गोकुळ क्षीरसागर याला नेवासा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!