Friday, July 1, 2022

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन व रुग्णालयात फळे वाटप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

सोनई/राहुल राजळे

राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव,घोगरगाव येथे युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले तसेच शनैश्वर ग्रामीण रुग्णालय शनीशिंगणापुर येथे उदयन गडाख मित्रमंडळ नेवासा तालुका व युवा सेना नेवासा तालुका यांच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी उदयन गडाख म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील असणारे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन करून नेवासा तालुक्यातील मित्रमंडळ व युवा सेना यांनी निसर्ग संवर्धन करण्यासाठी पाऊल टाकत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला व सामाजिक भान जपत गरजू रुग्णांना फळे वाटप केले.गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्री आदित्य ठाकरे सोनई येथे येऊन गेले होते व त्यांनी तरुणांशी संवाद साधला होता त्यामुळे आदित्य ठाकरे व सोनई व नेवासा तालुक्यातील तरुणांचे अनोखे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. याप्रसंगी बेलपिंपळगाव,घोगरगाव येथील कार्यकर्ते शिवसैनिक ,युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!