Thursday, June 30, 2022

राहुरी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठ सेवेत सामावून घ्या;अन्यथा १५ ऑगस्टला मुळा धरणात जलसमाधी घेणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

राहुरी

राहुरी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठ सेवेत सामावून घ्या अन्यथा १५ ऑगस्टला मुळा धरणात जलसमाधी घेऊ असा इशारा प्रकल्पग्रस्त कृती समितीने दिला आहे.

सोमवार दि. १३ जून २०२२ रोजी राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हंटले आहे की,महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे एक महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नावाजलेले कृषी विद्यापीठ आहे, १९६८ साली हे विद्यापीठ स्थापन झाले. त्यासाठी ५८४ खातेदारांच्या २८४९.८८ हेक्टर इतक्या जमीनीचे संपादन केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील खडांबे, वरवंडी, सडे, डिग्रस, राहुरी खुर्द, पिंपरी अवघड, या सहा गावातील शेतकरी प्रकल्प बाधित झालेले आहेत. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या आधारे मूळ प्रकल्पग्रस्तांच्या वारसाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी अत्यल्प मोबदल्यात विद्यापीठासाठी शासनास दिल्या आहेत. ज्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्या आश्वासनांपासून शासन दूर जात आहे.वेळोवेळी प्रकल्पग्रस्त बाबत वेगवेगळे शासन निर्णय काढून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यास तयार नाही.२००९ साली विद्यापीठाने ३५७ विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठ सेवेत सामावून घेतले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्त यांनी काय अन्याय केला म्हणून जमीन देऊन सुद्धा त्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी आमरण उपोषण केले, त्यानंतर कृषिमंत्री यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली १५ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई मंत्रालय येथे बैठक आयोजित केली. सदर बैठकीत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यानंतर पुन्हा एकदा कृती समितीने शेतकऱ्यांसाठी १४ मार्च ३०२२ रोजी कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले व पुन्हा एकदा कृषिमंत्री यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४ मार्च २०२२ रोजी पुन्हा एकदा मंत्रालय मुंबई येथे सचिव यांच्या समवेत बैठक घेऊन ही ठोस असा कुठलाही निर्णय घेतला नाही.
त्यामुळे विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांनी जमीन देऊ महाराष्ट्र शासन विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहे, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. पुन्हा एकदा राहुरी तालुक्यातील विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकल्पग्रस्त कृती समिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे अध्यक्ष संतोष भागवत पानसंबळ व समितीचे सचिव सम्राट लांडगे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विद्यापीठ सेवेत सामावून घेण्याचा निर्णय न झाल्यास विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांना १५ जुलै २०२२ नंतर स्वच्छेने मरणाची परवानगी शासनाने द्यावी, म्हणजे हा विषय शासनासाठी कायमचा संपेल. तसाही प्रकल्पग्रस्त शेतकरी देखील संपलाच आहे, १५ जुलै २०२२ पर्यंत निर्णय न झाल्यास दिनांक १५ ऑगस्ट २०२२, रोजी स्वातंत्र्यदिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे प्रकल्पग्रस्त शेतकरी मुळा धरण राहुरी येथे कुटुंबासमवेत जलसमाधी घेतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामास मा कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, याची गांभीर्याने शासनाने नोंद घ्यावी. त्यामुळे हा विषय शासनाने त्वरित गांभीर्याने घ्यावा व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा, स्वतःच्या वडिलोपार्जित जमिनी शासनास देऊन सुद्धा शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही हे महाराष्ट्र राज्याचे व शेतकऱ्यांची खरंच दुर्दैव आहे अशी भावना उपाध्यक्ष विजय शेडगे यांनी व्यक्त केली, यावेळी निवेदनाची प्रत कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांना देतांना कृती समितीचे उपाध्यक्ष विजय शेडगे तसेच सदस्य मनोज बारवकर, किशोर शेडगे, सुरेश पवार, अपंग प्रकल्पग्रस्त नारायण माने तसेच इतर विद्यापीठ प्रकल्पग्रस्त सदस्य उपस्थित होते. नोकरी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशी भावना अपंग प्रकल्पग्रस्त शेतकरी नारायण माने यांनी घोषणा दिली..

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!