नेवासा
माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे मुळे नेवासा तालुक्यात भाजपची वाताहत झाली असल्याचा आरोप नेवासा भाजपा नगरसेवक व गटनेते सचिन नागपुरे यांनी केला आहे.
नेवासा तालुक्यातील अनेक भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांनी गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून माजी आ बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर टीका करत मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बुधवार दि. 15 जुन 2022 रोजी नेवासा नगरपंचायत मधील
भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते नेवासा नगरपंचायत प्रभाग क्र. 5 चे विद्यमान नगरसेवक व भाजपाचे गटनेते सचिन नागपुरे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे.
यावेळी बोलताना सचिन नागपुरे पुढे म्हणाले की,मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेनेत काम करू. कायम फक्त स्वतः च्या स्वार्थाचा विचार करणाऱ्या व भाजपात राहूनही पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांना त्यांची जागा आगामी नेवासा नगरपंचायत निवडणुकीत दाखवून देऊ. येणाऱ्या निवडणूकित जर भाजप पक्षाने माजी आ मुरकुटे यांचेकडे नेतृत्व दिले तर भाजपाला उभे राहण्यासाठी उमेदवार ही मिळणार नाहीत अशी परिस्थिती नेवासा तालुक्यात निर्माण झाली असल्याचे सचिन नागपुरे म्हणाले.
सचिन नागपुरे व मित्रपरिवाराचे मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी नितिन देशमुख,बाळासाहेब निकम, ज्ञानेश्वर सिन्नरकर, श्रीनिवास रक्ताटे,नितिन नागपुरे आदी उपस्थित होते.
*भाजपाला गळती लागण्याचे कारण..*
नेवासा तालुक्यात भाजपाला गळती लागण्याचे एकमेव कारण म्हणजे माजी आ.बाळासाहेब मुरकुटे हे आहेत. ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून भाजपात उडी मारून निष्ठावान भाजप कार्यर्त्यांच्या जीवावर आमदारकी मिळवणारे मुरकुटे यांनी भाजपा वाढीसाठी नेवासा तालुक्यात एकही प्रयत्न केला नाही. याउलट मंत्री शंकरराव गडाख व त्यांचे कुटुंबीय यांचेवर खालच्या पातळीवर टीका करून त्यांना वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत आणून गडाखांचे राजकारण संपविण्याचा कुटील डाव मुरकुटे खेळले. स्वतः च्या व सोयऱ्या धायऱ्यांच्या विकासाठीच आमदारकीचा उपयोग करणाऱ्या मुरकुटे यांच्यामुळे आज भाजप सोडली.
–सचिन नागपुरे
गटनेते भाजपा नेवासा नगरपंचायत