माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा येथील एका कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे
पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता
अजित पवार यांनी विखे पाटील यांचे ते आमंत्रण धुडावून देत, सावध प्रतिक्रिया वक्तव्य केली.प्रवरा लोणी येथील प्रवरा मेडिकल फाउंडेशनने चार दिवसांपूर्वी आमदार राधाकृष्ण विखे
पाटील यांची एक मुलाखत ठेवली होती. अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत यांनी सांगितले की, फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत.
त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बारामती येथे सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरचे आज उद्घाटन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत
अजित पवार यांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्या बाबत पत्रकारांनी विचारले. त्यावर ते म्हणाले, आमचे इथे बरे चाललेय.
कोणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे सांगत त्यांनी विखेंचे आमंत्रण धुडकावले.याच मुलाखतीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवार-विखे कुटुंबातील वाद
हे वैयक्तिक नसल्याचे सांगितले होते. कालांतराने हे वाद कमी होतील अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. तर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी
सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत पार्थ पवार व रोहित पवार यांच्याशी ते भेटतात, बोलता असे सांगताना रोहित पवार हे माझे शत्रू नसल्याचे
सांगितले होते. आज अजित पवार यांनीही प्रतिक्रिया देताना सावधता बाळगली होती. त्यामुळे राज्यातील राजकारणात नवीन समीकरणे दिसतील का यावर चर्चा रंगत आहे.