भेंडा:तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे बंद करून संपूर्ण समाजातील घटकांचा विकास, तेलंगणाच्या धर्तीवर
करण्यासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात 288 मतदारसंघात पक्ष सभासद नोंदणी व पक्षप्रवेश सोहळा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी दिनांक 16 रांजणगाव (शें पु) गंगापूर विधानसभा जिल्हा संभाजीनगर
येथे एकता नगर ,पवन नगर येथे मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांच्यासह गंगापूर मतदारसंघाचे संतोष भाऊ माने यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.महा नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात पार पडला, याप्रसंगी सोमनाथ थोरात
यांनी तेलंगणा मॉडल विषयी कार्यकर्त्यांना माहिती दिली व जशास तसे तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात राबवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पक्षाचा प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले .महाराष्ट्रामध्ये सर्व समाजातील घटकांचा सर्वांगीण विकास करायचा
असेल तर भारत राष्ट्र समिती शिवाय शक्य नाही असे प्रतिपादन केले .तसेच संतोष भाऊ माने यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक परिस्थिती व राज्यकर्त्याच्या ना कर्तेपणा मुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतरत्र वळवली जात
आहेत त्यामुळे ,महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. जर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल भारत राष्ट्र समिती या पक्षाचा झेंडा कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचवावा, शेतकऱ्याची आत्महत्या बेरोजगारी भ्रष्टाचार या सर्व गोष्टीला
आळा घालण्यासाठी भारत राष्ट्र समितीचा प्रचार सर्व कार्यकर्त्यांनी अंतकरणातून करावा असे कळकळीचे आव्हान केले.याप्रसंगी नवनाथ बरबडे ,पांडुरंग गायकवाड, शंकर ननुरे, प्रतीक पाटील, चंद्रकांत चव्हाण, राजू जाधव, राजू अल्हाट ,समाधान वाघमारे,
शरद महाराज बनसोड ,महादेव कांबळे, आयुब पठाण, जाकीरलाल, सुलोचना दुशिंग ,रमा कांबळे, मंदाताई सपकाळ, संगीता पंडित, भागिनाथ कांबळे ,सिद्धार्थ खाजेकर, निसार पटेल, गणेश मोरे, महेश गायकवाड, गणेश सोनवणे, बापू खाजेकर ,गोविंद चव्हाण,
संजय पाठे,धीरज गायकवाड, कृष्णा गायकवाड, नारायण पवार, बालाजी खांडेकर, बापूराव परभणे, इत्यादी सह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला प्रस्ताविक व आभार शंकर ननुरे,यांनी मानले.