Thursday, June 30, 2022

तुम्हालाही येतोय का सेक्स व्हिडिओ कॉल ? मग ही बातमी वाचाच 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:न्युड व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करण्याची नवीन गुन्हेगारी प्रवृत्ती समोर येत आहे. विदेशात या घटना आधी घडायच्या,

मात्र आता भारतातही या घटनांमध्ये वाढ झालीय. या घटनांमध्ये सोशल मीडियाद्वारे सेक्स व्हिड़िओ कॉल करून अनेक व्यक्तींना ठगण्याचा प्रयत्न होतो.

मुंबईतून आता सेक्शटॉर्शनची घटना समोर आली आहे. हाऊसिंग फायनान्स फर्मच्या एका वरिष्ठ अधिकारी सेक्शटॉर्शनचा बळी पडला होता.

सेक्स व्हिडिओ लिक करण्याच्या धमकी देत त्याच्याकडून तब्बल 2.06 लाखाची खंडणी मागण्यात आली होती. या सेक्शटॉर्शनचा शिकार होत असल्याचे कळताच त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली,

त्यानंतर प्रकरण चव्हाट्यावर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वांद्रे (पश्चिम) येथील रहिवासी असलेल्या 57 वर्षीय हाऊसिंग फायनान्स फर्मच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला 11 जून रोजी व्हॉट्सअॅप मेसेज आला होता.

यामध्ये ‘व्हिडिओ सेक्स करण्यात इच्छुक आहात का? मेसेज करण्यात आला होता. त्याने ‘हो’ असे उत्तर दिल्यानंतर लगेचचं व्हिड़िओ कॉल आला.

व्हिडिओ कॉलमधल्या महिलेने तक्रारदाराला बाथरूममध्ये जाऊन कपडे काढण्यास सांगितले. महिलेच्या सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराने केले.तो बाथरूममध्ये गेला, त्याने

व्हिडिओ कॉलसमोरचं कपडे उतरवले. आणि अचानक काही मिनिटांनी हा व्हिडिओ कॉल डिसकनेक्ट झाला.  या घटनेच्या काही सेकंदांनंतर तक्रारदार महिलेचा दुसरा फोन आला. या फोन

कॉलमध्ये त्याचा सेक्स व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याची माहिती देण्यात आली. आणि 81 हजार रूपयांची खंडणी मांगून तो न्यूड व्हिडिओ त्याच्या कुटुंबीयांना आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

दोन दिवसांनंतर दिल्ली सायबर क्राईम बॉंचमधून बोलत असल्याची बतावणी करत, तक्रारदाराला या घटनेत अडकवण्याची धमकी देण्यात आली. तसेच या घटनेतून निर्दोष

बाहेर पडायचे असल्यास रणवीर गुप्ता नामक व्यक्तील फोन करण्यास सांगितले. तक्रारदाराने त्याप्रमाणे गुप्ता यांना फोनकरून त्यांना 51, 500 रूपये देण्यास सांगितले. नंतर पुन्हा सोशल

मीडियावरील व्हिडिओ हटवण्यासाठी पु्न्हा 51, 500 रूपये मांगितले होते. आणि नंतर पून्हा 1.03 लाख रुपये देण्यास सांगितले. समोरच्या व्यक्तीची सारखी पैशाची मागणी पाहता तक्रारदाराने पोलिसात तक्रार केली.

दरम्यान याप्रकरणी तक्रारदाराने वांद्रे पोलिसांत तक्रार केली आहे. ज्या व्यक्तीने फोन केला होता तो स्वतःचे नाव दिल्ली सायबर क्राइम सेलचे कॉन्स्टेबल विक्रम राठोड असल्याचे सांगितले होते.

अटक टाळण्यासाठी त्याने वारंवार धमकावून 2.06 लाख रुपये उकळल्याची तक्रार दिली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!