‘
माय महाराष्ट्र न्यूज:बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे गेल्या काही वर्षांत गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
आज लाखो व्यक्ती हृदयविकार आणि डायबेटीस यांसारख्या आजारांचा सामना करत आहेत. तसंच, या गोष्टींमुळे अन्य समस्यादेखील निर्माण होत आहेत. मूल न होणं किंवा मूल होण्यात
अडचणी निर्माण होणं ही समस्या त्यापैकीच एक होय. मूल होण्यात अडचणी येत असल्यानं अनेक जोडपी वैद्यकीय उपचारांची मदत घेत आहेत. मूल न होण्यामागे काही शारीरिक
समस्या कारणीभूत आहेत. विवाहानंतर प्रत्येक पुरुष पिता होण्याचं स्वप्न बघतो; पण शारीरिक समस्या निर्माण झाल्याने हे स्वप्न पूर्ण होत नाही. पुरुषाच्या शरिरात काही घटकांची कमतरता
निर्माण झाल्यास किंवा या घटकांमध्ये दोष निर्माण झाल्यास त्याला पिता होण्यात अडचणी येतात. या घटकांमध्ये प्रामुख्याने टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि कॅल्शियमचा समावेश असतो.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आहार-विहारावर परिणाम होत आहे. तसंच ताण-तणावातदेखील वाढ झाली आहे. या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. पुरुषांनादेखील
या कारणांमुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही घटकांच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये शारीरिक समस्या उद्भवतात, याबद्दलचे वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने प्रसिद्ध केलं आहे.
कॅल्शियम हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. पुरुषांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असणं योग्य नाही. कॅल्शियमची कमतरता असल्यास शुक्राणूंची गुणवत्ता खराब होते.
त्यामुळे पिता होण्यात अडचणी येतात. ही कमतरता दूर करण्यासाठी पुरुषांनी रोजच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.
इस्ट्रोजेन हे महिला आणि पुरुष अशा दोघांमध्येही असलेलं हॉर्मोन आहे. पुरुषांच्या शरीरात इस्ट्रोजेनची कमतरता असेल तर शुक्राणू कमजोर होतात. त्यामुळे पुरुषांना पिता होण्यात अडचणी
येतात. तसंच, या हॉर्मोनच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या एकंदर आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या हॉर्मोनचं प्रमाण वाढण्यासाठी नियमित व्यायाम करणं, संतुलित आणि कमी फॅट
असलेला आहार घेणं, तसंच रोज आठ तास झोप घेणं आवश्यक आहे.टेस्टोस्टेरॉन हेही एक हॉर्मोन असून, ते पुरुषांच्या अंडकोषांमध्ये असतं. या हॉर्मोनमुळे पुरुषांमध्ये लैंगिक
इच्छा जागृत होते. पिता होण्यासाठी टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. रोज योग्य आहार घेतल्यास या हॉर्मोनची पातळी वाढवता येते.