Friday, July 1, 2022

उत्पादन डबल देणाऱ्या उसाच्या या नव्या जातीला VSI कडून लवकरच मान्यता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वसंतदादा शुगर इंन्स्टीट्युटच्या माध्यमातून बियाणांचे नवनवीन प्रयोग घेतले जात आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना नेहमी होत असतो.

व्हीएसआयची उत्पादने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी या व्हीएसआयच्या माध्यमातून विविध शेती उपयुक्त उत्पादने घेत असतो.

दरम्यान व्हीएसआयकडून नवीन उसाच्या जातीचा शोध लावण्यात आला आहे. मागच्या 7 वर्षांपासून साखर कारखान्यांच्या चर्चेत असलेल्या ‘को ‘व्हीएसआय 18121 या उसाच्या

नवीन जातीच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. लागवडीसाठी या जातीची शिफारस 2024पर्यंत होण्याची शक्यता असल्याचे व्हीएसआयकडून माहिती देण्यात आली आहे.

सध्या शेतकरी आणि साखर कारखान्यांमध्ये ‘को 86032’ हे वाण जास्त प्रमाणात वापरले जाते. मात्र उत्पादन आणि उतारा या दोन्ही मुद्द्यांवर ‘18121 वाण’ सरस ठरते आहे. या वाणावर

गेल्या काही वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) या दोन संस्था संयुक्तपणे संशोधन करीत आहेत.

कोव्हीएसआय 18121 हे नवे वाण तयार करण्यासाठी ‘को 86032’ व ‘कोटी 8201१’ अशा दोन वाणांचा संकर घडवून आणला गेला आहे. या वाणाच्या चाचण्या समाधानकारकपणे सुरू आहेत.

‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख व संचालक संभाजी कडू पाटील यांच्याकडून सातत्याने माहिती घेतली जात आहे. साखर उद्योगात अधिकाधिक साखर उतारा देणारी

उसाची जात हाती असणे हीच मुख्य बाब समजली जाते. ‘आयसीएआर’च्या कोइमतूरमधील ऊस पैदास संशोधन संस्थेचे संचालक बक्षी राम यांनी ‘को-0239’ हे सर्वोत्कृष्ट वाण शोधले.

हे वाण उत्तर प्रदेशाने स्वीकारल्यानंतर सरासरी उत्पादन हेक्टरी 80 टनाच्या पुढे गेले. त्यामुळे तेथील साखर उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे.2018 मध्ये ‘व्हीएसआय’ने पाण्याचा

ताण सहन करणारी ‘08005’ ही उसाची नवी जात प्रसारित केल्यानंतर राज्याच्या दुष्काळी भागात उसाची लागवड वाढली. यानंतर व्हीएसआयने 18121 वाणाच्या चाचण्या अजून

काही महिने चालतील असे सांगितले आहे. त्यानंतर विद्यापीठांच्या चाचण्यांसाठी पूर्वप्रसारित होईल. 2024 ते 25 पर्यंत या वाणाच्या गाळप चाचण्या होतील. त्यातील निष्कर्ष पाहूनच

सार्वत्रिक लागवडीसाठी शिफारस केली जाईल, अशी माहिती ‘व्हीएसआय’च्या सूत्रांनी एग्रोवनला दिली.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!