Friday, July 1, 2022

नेवासाचे पोलीस पथकावर डिझेल चोरांचा हल्ला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

डिझेल चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या नेवासाचे पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याने पोलिस निरीक्षक विजय करे यांचेसह पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज घडली.डिझेल भरलेले सहा कॅनसह आरोपीना जेरबंद केले आहेत.

याबाबद अधिक माहिती दिनांक 17.06.2022 रोजी पहाटे 04.30 वाजता पोलिस निरीक्षक विजय करे यांचे सह उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलिस नायक बबन नमनर, पोको अंबादास गिते, पोको योगेश आव्हाड, रामचंद्र वैद्य, पाक संदीप म्हस्के, बाळासाहेब खेडकर असे सर्वांनी औरंगाबाद ते अहमदनगर रोडवर डिझेल चोर तसेच रोड रॉबरी करणारे चारांना पकडण्यासाठी सापळा लावून औरंगाबाद ते अहमदनगर या महामार्गावरून फिरत असताना एक स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MP 13 CD 1808 मधील चौघेजण त्रिमूर्ती कॉलेजचे विरुद्ध बाजुस नेवासा फाट्याकडे काही अंतरावर औरंगाबाद ते अहमदनगर मार्गावर वाहनात बिघाड झाल्याने रस्त्याचे बाजूस उभे असलेला ट्रक क्रमांक MH 06 BD 1326 या ट्रकचे डिझेलच्या टाकीमधून विरुध्द बाजूने पाईपच्या मदतीन डिझेल निळ्या रंगाचे अंदाजे 35 लिटर आकाराच्या कॅन मध्ये काढत असताना दिसले.
त्या चौघांना रंगहात पकडण्यासाठी निरीक्षक विजय करे व सोबत असलेले पोना बबन तमनर, पोको योगेश आव्हाड गेले असता, स्विफ्ट डिझायर कारचे चालकाने आगोदर सदरची कार काही अंतर वेगात ट्रकचे बाजुस मागे घेऊन तितक्या वेगात पुढे घेतल्याने बाजूचे दरवाजास पकडण्याकरीता असलेले पोको आव्हाड, पोको गित हे जखमी झाले. तर त्या गाड़ी समोर पोनि विजय करे यांचे अंगावर गाडी घातली असता, बोनेटवरून ते उडुन डाव्या बाजूस दोन्ही कारच मध्यभागी डांबरिवर पडले असता सदर कारची डावी बाजू ही त्यांचे अंगाला घासुन पुढे निघून गेली. त्यानंतर पोलीसांनी सदर गाडीचा सिनेस्टाईलन पाठलाग सुरू केला. तेव्हा सदर स्विफ्ट डिझायर कार चालकाने त्यांच कारची डिक्की उघडली व डावे बाजूचा दरवाजा तुटलेला असताना सुध्दा त्याने अशा स्थितीत भरधाव वेगाने कुकाणा, भेंडा गावचे दिशेने पळविली. सदरची स्विफ्ट गाडी पुढे व पोलीसांची गाडी ही काही अंतरावर पाठीमागे असे भेड़ा कारखाना चौकात गेले असता सदर कार चालकाने गाडी जागेवर वळवून पुन्हा नेवासा फाट्याच्या दिशेन घेतली व भानसहिवरा गावात घालून माळी चिंचोरा फाटाचे दिशेने वेगात पळविण्यांत आली.

त्यावरून लगेच पानि करे यांनी LCB चे सहाय्याक पोलिस निरीक्षक दिवटे यांचे सोबत संपर्क करून त्यांचा सुद्धा सदरची गाडी पकडण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर सदर स्विफ्ट गाडी चालकाने शनि शिंगणापुर रोडने गेला असता, त्यावेळी LCB चे संपानि दिवटे व त्यांचे सोबत असलेल्या पोलीस स्टाफने यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी LCB च्या पथकाला चकवा देवून सदरची स्विफ्ट कार सोनई येथून घोडेगांव व त्यानंतर मिनाक्षी होटल पासून मोरया चिंचोरा गावचे शिवारात वेगात असताना त्यांनी त्यानंतर काहीसा वेग कामी करत स्विफ्ट चालकाने गाडीतून उडी मारुन रस्त्याचे बाजूस असलेल ऊसाचे शेतात पळाला.तर डावे बाजुस असलेला इसम हा गाडीतुन खाली पडुन पळत असताना त्यांस पकडण्यांत पानि विजय करे व त्यांच्या पोलीस पथकाला यश आले.
त्यानंतर त्याचेकडे विचारपुस करीत असता, त्याने त्याच नांव चनसिंग प्रेमसिंग ठाकुर (वय 28 वर्ष) रा. ता.जि. माझापुर मध्यप्रदेश व त्याच साथीदार स्विफ्ट कार चालका महान इतर तीन साथीदार विकास मूलचंद कुशवाह (वय 35 वर्ष) रा. लक्ष्मीनगर साझापुर मध्यप्रदेश,चालक जांबाझ कसाब खान (वय 35 वर्ष) रा.धुपाडे, तहसील साझापूर जि. साझापूर मध्यप्रदेश), विकास मूलचंद कुशवाह यांचा मित्र रा. माझापुर,मध्यप्रदेश अशी असल्याचे सांगितले. वरील नमुद तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
परंतु डिझल चोर आरोपी चनसिंग प्रेमसिंग ठाकूर याला पकडून त्याच्याकडू पालीसांना 35 लिटरच 06 कॅन भरून डिझल तसेच एक पांढऱ्या
रंगाची स्विफ्ट डिझायर कार ताब्यात घेऊन त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून त्याचा पुढील तपास उपनिरीक्षक समाधान भाटवाल हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे ,स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिवटे सपोनि , श्री. समाधान भाटवाल, उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोना बबन तमनर ,पोको बाळासाहेब खेडकर, पोको संदीप म्हस्के, पोको अंबादास गिते, पोको योगेश आव्हाड, पोको रामचंद्र वैद्य यांनी संयुक्तपणे केली आहे.

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!