Friday, July 1, 2022

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर  कारखाना कामगार पतसंस्थेच्या सभासदांना १ कोटी ३३ लाख रुपयांचे वाटप-अनिल शेवाळे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश  व टक्के ठेवींवरील व्याज अशी एकूण १ कोटी ३३ लाख १८ हजार ६७६ रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल शेवाळे यांनी दिली.

ज्ञानेश्वर कारखाना कामगार पतसंस्थेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.१७ जून रोजी दुपारी ४ वाजता कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष अनिल शेवाळे यांचे अध्यक्षतेखाली झाली.
कारखान्याचे सचिव व पतसंस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र मोटे,तांत्रिक सल्लागार एम.एस.मुरकुटे, शेतकी अधिकारी सुरेश आहेर,कामगार संचालक सुखदेव फुलारी, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,कामगार संघटनेचे सहखजिनदार संभाजीराव माळवदे,उपअभियंता रमेश मोटे,उपशेतकी अधिकारी सतीश डावखर,पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब लबडे, भानुदास कावरे,पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बावळे, संभाजी भुसारी,भराट केशव भराट, सचिन निकम, केशव जगधने, मच्छिद्र चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष अनिल शेवाळे पुढे म्हणाले,लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांनी दिलेल्या विचारानुसार आणि कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग ,अड देसाई देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सभासदांचे हितासाठी संस्थेचे कार्य सुरू आहे.संस्थेला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४७ लाख ७९ हजार २०९ रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांचे ठेवीवरील  व्याजाची रक्कम ९८ लाख ४९ हजार १०७ व १५ टक्के लाभांशाची रक्कम  ३४ लाख ६९ हजार ५६९ रुपये अशी एकूण रक्कम १ कोटी ३३ लाख १८ हजार ६७६ रुपये  सभासदांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

सभेत सभासद कर्ज मर्यादा कायम कामगारांसाठी ३.५ वरून ४ लाख रुपये व हंगामी कामगारांसाठी ३ वरून ३.५ लाख तर ट्रेनी कामगार ८० हजारावरून १ लाख  रुपये करणेचे पोटनिनियम दुरुस्तीचे ठराव मंजूर करण्यात आले.
काकासाहेब लबडे, शिवाजी वाबळे,राजू काठवटे , सोपान कचरे,श्री.जाधव,श्री.खाटीक यांनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी अजय देशमुख, विष्णू वाबळे,श्रीकृष्ण उगले, सुरेश आरगडे,बाप्पासाहेब बामदळे, दत्तात्रय चोपडे,शोएब शेख, पतसंस्थेचे सहसचिव सुरेश उगले,सुरेश उभेदळ,सुरेश भुसारी,हिरामण साळवे,बाळासाहेब कुसाळकर,अंकुश दाभाडे, विलास परदेशी, किरण मनवेलीकर यांचेसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पतसंस्थेचे मानद सचिव विजय गव्हाणे  यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले.
संचालक केशव जगधने यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!