माय महाराष्ट्र न्यूज:संभाजीनगर येथे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन पक्षाचे मराठवाडा विभाग समन्वयक सोमनाथ थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास पक्षाचे जिल्हा समन्वयक अण्णासाहेब माने साहेब, विधानसभा समन्वयक अब्दुल कदीर, जयमलसिंग रांधवा , कैलास तवर, फिरोज पटेल, बाळासाहेब सानप, खालीद पटेल, संतोष माने, तसेच अनेक कार्यकर्ते हजर होते.
यावेळी निफाड तालुक्यातील कानळद येथील सरपंच शांताराम जाधव, सोमनाथ पानगव्हाणे यांनी पक्षप्रवेश केला. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते हजर होते.