माय महाराष्ट्र न्यूज:रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा म्हणजेच मोबाईल , वायफाय, लॅपटॉपचा वापर केल्याने आपण अनेक प्रकारे
शारीरिक आणि मानसिक आजारांनी ग्रस्त होऊ शकतो. त्यामुळे झोप आणि आरोग्यावर तर परिणाम होतोच, शिवाय शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम होऊ शकतो. नोएडामधील नोवा
साउथेंड आईवीएफ अॅंड फर्टिलिटी कंसल्टंट आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ पारुल गुप्ता खन्ना यांच्या मते, पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी होणं किंवा नपुंसकत्वाच्या वाढत्या
प्रकरणांची संख्या लक्षात घेता देशभरातील अनेक डॉक्टर यावर ठाम झाले आहेत की तंत्रज्ञानावर अवलंबून असलेली जीवनशैली हे याचे प्रमुख कारण आहे.जवळपास एक दशकापूर्वी
मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अगदी मायक्रोवेव्ह मानवी प्रजनन क्षमता कमी करू शकतात किंवा नपुंसकत्व आणू शकतात का हे शोधण्यासाठी अनेक अभ्यास केले गेले. अनेक
अभ्यासांमध्ये आढळून आले की मोबाईल फोनचा अतिवापर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा स्पर्मच्या गतिशीलतेवर नकारात्मक परिणाम होतो. जर शुक्राणूंची हालचाल किंवा गतिशीलता
स्थिती खराब असेल तर शुक्राणू नीट तरंगत नाहीत, ज्यामुळे नपुंसकत्व किंवा प्रजनन क्षमता कमी होण्याची समस्या उद्भवते.पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी होणं किंवा उच्च नपुंसकत्वाची
कारणे समजून घेणे आणि त्यावर उपचार करणे ही काळाची गरज आहे. मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, टीव्ही, वाय-फाय, फोन टॉवर्स आणि रडारमधून नॉन-आयोनायझिंग
रेडिएशन देखील अंडकोष किंवा वृषणावर परिणाम करतात. हे शुक्राणूंची संख्या, त्यांचा आकार आणि त्यांची हालचाल यावर गंभीर परिणाम करू शकते.एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल
अँड क्लिनिकल रिसर्चच्या अभ्यासानुसार, सामान्य लोकसंख्येतील 15 ते 20 टक्के लोकांना प्रजनन क्षमता कमी असणं किंवा नपुसंकतेची समस्या आहे. जिथे पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेचे
योगदान 20 ते 40 टक्के आहे. भारतातील 23 टक्के पुरुष कमी प्रजनन क्षमता किंवा नपुंसकत्वाच्या अभावाने त्रस्त आहेत.पुरुषांनो, काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या स्पर्म्सची क्वॉलिटी सुधारू
शकता आणि नपुंसकता टाळू शकता.शुक्राणूंचे म्हणजेच स्पर्मचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रात्रीची गाढ, शांत व पूर्ण झोप घेणे खूप महत्वाचे आहे. स्पर्म्सची गुणवत्ता किंवा क्वालिटी चांगली
ठेवण्यासाठी रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. दररोज रात्री झोपण्याची वेळ एकच ठेवणे स्पर्मसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठीच चांगले आहे. जर तुम्ही रोज रात्री
झोपण्यासाठी वेगवेगळ्या वेळा निवडायला गेलात तर त्यामुळे तुमच्या शरीराच्या चक्रात किंवा बॉडी क्लॉकमध्ये अडथळा येऊ शकतो आणि पोटाशी संबंधित आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.
तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की येथे मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करण्यास सांगितले जात नाहीये तर निरोगी शरीरासाठी दररोज मोबाईलचा वापर कमी करण्यास सांगितले
जात आहे. मोबाईलचे रेडिएशन टाळण्यासाठी मोबाईल कुठे ठेवायचा याचे भान ठेवावे लागेल. त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेकजण खिशात
मोबाईल ठेवतात पण त्याऐवजी तो बॅगमध्ये ठेवला तर मोबाईलमधील रेडिएशनचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल.