Thursday, June 30, 2022

Jio ने युजर्सला दिला मोठा झटका

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजच्या काळात स्मार्टफोनचा वापर न करणारी व्यक्ती क्वचितच असेल! जर तुम्ही रिलायन्स जिओचे यूजर असाल तर Jio ने आपल्या काही प्लॅनच्या किंमती

20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. कंपनीने कोणत्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत आणि त्यांची नवीन किंमत काय आहे ते जाणून घेऊया.जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनची ​​

किंमत वाढवली आहे. काही काळापूर्वी Jio ने JioPhone नावाचा स्वतःचा स्वस्त फीचर फोन लॉन्च केला होता.जिओ फोन वापरकर्त्यांना कंपनी काही खास योजना ऑफर करते. जिओने

तिन्ही जिओफोन रिचार्ज प्‍लॅनच्‍या किंमती वाढवल्‍या आहेत. हे तिन्ही प्लॅन आतापर्यंत 20% च्या सवलतीत दिले जात होते, परंतु आता ती ऑफर काढून टाकण्यात आली आहे. ज्यामुळे रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत.

JioPhone चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, ज्याची किंमत 155 रुपये होती. ती 186 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा,

कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत.185 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत आता 222 रुपयांवर गेली आहे. हा प्लॅन

दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS च्या फायद्यांसह येतो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनची ​​वैधता देखील 28 दिवसांची आहे.

JioPhone रिचार्ज प्लॅनमधील सर्वात महाग आणि सर्वोत्कृष्ट प्लॅन आता 899 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर आधी या प्लॅनची ​​किंमत 749 रुपये होती. या प्लॅनमध्ये तुम्हाला

336 दिवसांची वैधता दिली जात आहे. या दरम्यान तुम्ही 24GB डेटा वापरू शकता. हा प्लान 28 दिवसांसाठी 2GB डेटा देतो आणि त्यानंतर दर 28 दिवसांनी त्याचे रिन्यू केले जाते.

या प्लॅन्समध्ये दर 28 दिवसांसाठी 50 एसएमएस आणि फ्री व्हॉइस कॉलिंग सारखे फायदे देखील आहेत आणि तुम्हाला यामध्ये कंटेंट आणि सेवा ऑफर देखील दिल्या जातात.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!