Friday, July 1, 2022

श्रीरामपूर शहरात 8 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुसासह तीन आरोपींना अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

श्रीरामपूर/प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरात विक्री करण्याचे उद्देशाने 8 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुस बेकायदशिररित्या कब्जात बाळगणा-या तीन आरोपींची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलींद भारंबे यांनी दि. १६/०६/२२ ते ३०/०६/२२ या कालावधी दरम्यान अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाबद विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशानुसार साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परीक्षेत्र श्री. बी. जी. शेखर पाटील व
पोलीस अधिक्षक, अहमदनगर श्री. मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. अनिल कटके यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाबत जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले.
या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे पोलिस निरीक्षक श्री. अनिल कटके हे अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्र व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना श्री. कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, दाढी वाढलेले तीन इसम हे गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी हॉटेल राधिकाचे पार्किंग जवळ, ता. श्रीरामपूर येणार आहे. आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने श्री. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सफौ. राजेंद्र बाघ, सफौ संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, शंकर चौधरी, सुरेश माळी, रवि सोनटक्के, पोकॉ मयुर गायकवाड, सागर ससाणे व चालक पोहेकॉ चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी हॉटेल राधिकाचे पार्किंग जवळ, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात हॉटेल राधिकाचे गाड्यांचे पार्किंगकडे दाढी वाढलेले तीन इसम आजुबाजूला संशयीतरित्या टेहळणी करत पायी येतांना दिसले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत इसमांना घेराव घालून ताब्यात घेण्णाचे तयारीत असतांना संशयीत इसमांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीतांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयीत तीनही इसमांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे अशी राहुलसिंग फत्तुसिंग कलानी (वय २५ वर्षे), आकाशसिंग बादलसिंग जुनी (वय २२ वर्षे) , अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (वय २२ वर्षे) सर्व रा. श्रीरामपुर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड नं. ३, ता. श्रीरामपुर असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये आठ (8) गावठी बनावटी कड्डे, वहा (10) जिवंत काडतूसे व सॅक असे एकूण 2 लाख 45 हजार 100 रु. किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त करण्यात आला.

नमुद तीन इसम हे श्रीरामपूर शहरात आठ (8) व वहा (10) जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत सफौ राजेंद्र देवमन वाघ नेमनुक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अॅक्ट कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर श्रीमती. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्री.संदीप मिटके
यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!