Sunday, July 3, 2022

बुऱ्हानगरसह ४४ गावाची पाणीयोजना वीज कनेक्शन तातडीने सुरू करण्याचे ना. तनपुरे यांच्या सूचना

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या अनेक दिवसापासून बुऱ्हाणनगर सह 44 गावांची पाणी योजना थकीत वीज बिलामुळे बंद असून सदर योजनेचे वीज कनेक्शन तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी

महावितरणच्या अधिकारी यांना दिल्या. तसेच या योजनेच्या कामावरील शाखा अभियंता याच्या निष्काळजी पणा मुळे त्यांना तातडीने निलंबीत करण्याचे आदेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.या योजनेतील गावांना जलजीवन मिशन योजनेतर्गत कायम स्वरूपी पाणी कसे देता येईल या बाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बुऱ्हाणनगर सह 44 गावांची योजना विस्कळीत झाल्याने ह्या योजनेवरील नागरिकांना जलजीवन मिशन योजने तुन सुरळीत पाणी पुरवठा करण्याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी जीवन

प्राधिकरण खात्याच्या तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्या बरोबर चर्चा केली.सदर योजनेचे वीज कनेक्शन तातडीने जोडून देण्याचे आदेश महावितरणाचे कार्यकारी अभियंता एस एस काकडे ह्यांना दिल्याने सदर योजनेचा पाणीपुरवठा सुरु होईल असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी सांगितले.

आज विधान परिषदेच्या निवडणुकीची मुंबई येथे जोरदार हालचाली असताना सुद्धा बुऱ्हाणनगर सह 44 गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राहुरी पंचायत

समितीच्या डॉ दादासाहेब तनपुरे सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ए ए मुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी

अभियंता आनंद रुपनर महावितरणचे कार्यकारी अभियंता एस एस काकडे गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे राहुरीचे ग्रामीण पाणीपुरवठायचे उपभियंता एस एस गडढे जीवन प्राधिकरणचे उपभियंता व्ही आर देसाई,टी एच तुपे उपभियंता सी एस खाडे,

उपभियंता श्रीमती चोभे सहाय्यक गट विकास अधिकारी अनंत परदेशीं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके सुरेश निमसे आदि उपस्थित होते.सदर योजनेच्या थकीत वीज बिल भरण्यासाठी मुख्य

कार्यकारी अधिकारी ह्यांचेशी गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेली बुऱ्हाणनगर सह 44 गावाची योजना गेल्या काही दिवसापासून विविध कारणामुळे बंद आहे. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.त्याबाबत

राज्यमंत्री तनपुरे ह्यांनी सदर योजना सदया आहे त्यापेक्षा अधिक चांगली कशी चालवता येईल,राबवता येईल यावर अधिकारी व योजनेत समाविष्ठ असलेल्या सरपंच ग्रामसेवक सदस्य ह्यांचेशी सविस्तर चर्चा करताना म्हणाले की सरपंच सदस्य

यांचे तक्रारी वरून या योजनेवर कार्यरत असलेला शाखा अभियंताचा निष्काळजी पणा पाहता त्यास तातडीने निलंबीत करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना आदेश दिले. त्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी. आजच्या

बैठकीत ज्या काही सूचना अधिकारी वर्गास केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. त्याची पाहणी करण्यासाठी येत्या 8 ते 10 दिवसात सदर पंप हाऊस येथे भेट देणार असून तेथील आकडेवारी नुसार पाण्याचे पंपिग होते का नाही याची

तपासणी करणार आहे. त्याबाबत येत्या 8 दिवसात योग्य ती ती कार्यवाही करावी. मी या योजनेबाबत आतापर्यंत 3 बैठका घेऊनही त्यात सुधारणा का होऊ शकली नाही. असा प्रश्न अधिकाऱ्यांना करून ह्याबाबत ही शेवटी सूचना देतो अन्यथा एका अधिकाऱ्याला निलंबीत केले पुन्हा तीच वेळ येऊ देऊन नका असा इशारा उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या 44 गावांसाठी जलजीवन मिशन मधून नवीन योजना तयार करायची असून त्यात नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसूबा,पिंपळगाव माळवी, धनगर वाडी, जेऊर व आजूबाजूच्या वाड्या, बहीरवाडी, ससेवाडी, इमामपूर शेंडी पोखर्डी पिंपळगाव उज्जेन या 11 गावांनी जाईंट वेलला मान्यता दिली असून त्यासाठी स्वतंत्र विळद पासून वेगळी पाईप लाईन टाकून देण्याची मागणी केली आहे.15 /16 गावांसाठी सदर योजना व्यवस्थित होऊ शकते. त्याबाबत सविस्तर अभ्यास करून पुढील बैठकीत माहिती देण्याच्या सूचना केल्या.

राहुरी तालुक्यातील 6 गावे खडांबे खुर्द खडांबे बुद्रुक, धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, वरवंडी बाभुळगाव या गावांनी सदर योजनेत राहायचे नसून आम्हाला स्वतंत्र योजना जल जीवन मिशन मधून देण्याची मागणी केली. यासाठी सद्या कार्यरत असलेल्या फिल्टर हाऊस असून तिथे पेविंग मोटार टाकून स्वतंत्र पाईप लाईन करता येणे शक्य आहे. नव्याने होणाऱ्या बुऱ्हाणनगर योजनेसाठी मोठ्या साईजचे पंप बसविण्यात येणार आहे त्याबाबत संबंधित दोन्ही विभागाने ते तपासून घ्यावे

नवीन पंप आहे त्या जॅकवेल बसू शकते का? तरच सदर 6 गावांची योजना स्वतंत्र राबविता येईल.

बुऱ्हाणनगर पाणी योजनेवरील समास्याबाबत चर्चा करण्यापेक्षा व जागोजागी ढिगळ लावीत बसण्यापेक्षा सदर योजना मुळा पासून सुरु झाली पाहिजे. पंतप्रधानानी जी घोषणा केली घर घर पाणी ही घोषणा केवळ कागदावर न राहाता त्याचे व्यवस्थित नियोजन करून पाणी घरोघर कसे जाईल नाही तर ते पाणी योजनेतील गावांना न जाता सदर योजनेचे पाणी कुठे जाते हेही तपासावे लागेल. शासन पाणी योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च करते त्या योजना कमीत कमी 25 ते 30 वर्ष तरी टिकल्या पाहिजे. पाण्याचा प्रश्न भविष्यात उद्भवणार नाही असा माझा प्रयत्न असल्याचे यावेळी राज्यमंत्री तनपुरे ह्यानी सांगितले.

या बैठकीस डोगरगणचे सरपंच संतोष पटारे इमाम पुरचे सरपंच भिमराज मोकाटे, पोखर्डीचे सरपंच रामेश्वर निमसे बहीरवाडीचे सरपंच विलास सावंत, अध्यक्ष रामदास ससे,सरपंच किशोर शिकारे धामोरीचे सरपंच अशोक बकरे,सरपंच सुनीता पवार, खडाबे सरपंच कैलास पवार, खडाबे खुर्दचे सरपंच कानिफनाथ कल्हापुरे, प्रभाकर हरीश्चंद्रे प्रदीप लांडगे, दिलीप जठार शामराव खेतमालीस नंदकुमार गागरे,विविध गावाचे उपसरपंच सदस्य ग्रामसेवक अधिकारी उपस्थित होते.

(राहुरी तालुक्यात जल जीवन मिशनचे कामाचे दिलेले उदिष्ट 100 टक्के पुर्ण केल्याबद्दल राहुरी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व उपभियंता एस एस गडढे व सर्व स्टाफचे कौतुक केले.)

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!