नेवासा
नेवासा तालुक्यातील सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्था, नेवासा तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट व डाॅक्टर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने
पंढरपूर आषाढी वारीतील वारक-यांना सव्वा लाख रुपये किंमतीचे औषधे व पौष्टिक आहार म्हणून नाचणीसत्व व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
या विशेष कार्याचे तालुक्यातून स्वागत होत आहे.
पांढरीपुल परीसरात सदगुरु नारायणगिरी आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते हिगोंणी पायी दिंडीतील भक्तांना औषधांचे वाटप करुन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुळा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम झिने,उद्योजक सुदाम तागड, पसायदान-आनंदवन संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले,सचिव संजय गर्जे, डाॅ.माऊली दरंदले, अरुण घावटे,कृष्णा सुद्रिक, संदीप घोलप, शहाराम तांदळे उपस्थित होते. डाॅ.तुषार दराडे यांनी उपक्रमाची माहिती दिली.
आनंदवन व मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी पांढरीपुल,वाकुडी फाटा, दरेवाडी,
वाळुंज,रुईछत्तीशी व थेरगाव येथे जाऊन गणेशवाडी, लांडेवाडी, वडाळाबहिरोबा,खरवंडी व नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व दिंडीतील वारक-यांना गुडघेदुखी वरील ट्युब व इतर औषधांचे वाटप केले. पंढरपूर रस्त्याने पायी चाललेल्या इतर जिल्ह्य़ातील भक्तांनाही औषधांचे वाटप करण्यात आले.पांढरीपूल येथील भुमाता फुड कंपनीचे संचालक गणेश शिंदे परीवाराच्या वतीने वारक-यांना नाचणी सत्व व पौष्टिक आहार म्हणून बिस्किट देण्यात आले.
वितरण कार्यक्रमात डाॅ.तुषार दराडे यांनी आनंदवनच्या कार्याची माहिती देवून दिडीतील उपक्रमाची माहिती दिली.शिवाजी महाराज देशमुख, राम महाराज बोचरे,निवृत्ती महाराज लांडे, बाबुराव महाराज लोहकरे,देवराव महाराज लांडे,संजय महाराज लोहकरे, अशोक महाराज नरवडे आदींनी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.