Friday, July 1, 2022

देवगाव सोसायटीवर ना.गडाख गटाचे वर्चस्व

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या ताब्यात असलेल्या देवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये सत्तांतर झाले असुन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या लोकनेते स्व. मारूतराव घुले पाटील शेतकरी विकास पॅनेलने सर्व जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे.

नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या देवगाव सोसायटीची सत्ता आज पर्यंत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात होती.
एकूण मतदान पात्र 1110 मतदार सभासद असलेल्या देवगाव सोसायटी च्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिये दरम्यान उमेदवारी अर्ज भरणेची शेवटीची मुदत दि.20/5/2022 होती.
या कालावधीत मुरकुटे गटाला एक ही उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.परंतु ज्ञानदेव कारभारी पाडळे व त्यांच्या पत्नी चंद्रकला ज्ञानदेव पाडळे या दिघांचेच कर्जदार व महिला मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज राहिल्याने एकूण 10 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया करावी लागली. त्यामुळे दि.19 जून रोजी मतदान होऊन निकाल जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे भटके-विमुक्त,ओबीसी व अनुसूचित जाती मतदार संघातील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे सर्वंच्या सर्व 13 जागा या पॅनेलने जिंकलेल्या आहेत.त्यामुळे देवगाव सोसायटी संचालक मंडळावर नामदार गडाख यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.

लोकनेते स्व. मारूतराव घुले पाटील शेतकरी विकास पॅनलचे निवडून आलेले उमेदवार व त्यांना पडलेली मते अशी….

* सर्वसाधास्ण कर्जदार मतदार संघ:-
१) आगळे बाबानाथ कारभारी (६३४)
२) निकम गोरक्षनाथ आसाराम (६३७)
३) निकम सुभाष विश्वनाथ (६४९ )
४)निकम ज्ञानदेव सिताराम मते (६३५)
५) पाडळे चंद्रकला ज्ञानदेव मते (३२५ अपक्ष पराभूत)
६) पाडळे बाबासाहेब गोवर्धन (६७५)
७) पाडळे ज्ञानदेव कारभारी (३५३ अपक्ष पराभुत)
८) भंडारी कुंदनमल शांतीलाल (६३५)
९) मोरे शिवाजी गोरक्षनाथ (६५७)
१०) शेख नुरमहमंद शेखनुर (५८७)

*माहिला राखीव मतदार संघ:–
१) ठोंबरे पार्वती मारूती (६५५)
२) पाडळे चंद्रकला ज्ञानदेव (३०७ अपक्ष पराभुत)
३ ) शिंदे शारदा राधाकृष्ण (६०४)

* भटके-विंमुक्त:-रोडगे चंद्रभान अंबादास (बिनविरोध)
*अनुसूचित जाती:-काळे माच्छींद्र योसेफ (बिनविरोध)
* ओबीसी:-गायकवाड सखाहरी कारभारी (बिनविरोध)

*मुरकुटेंनी निवडणूक लादली…*

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वत:च्या गावातील देवगाव सोसायटी
निवडणुकीत उभे करण्यासाठी  उमेदवार न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेवराला फूस लावून अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवून सोसायटीची निवडणूक लादली.परंतु सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
श्री.महेश निकम
लोकनेते मारुतराव घुले पा.शेतकरी विकास पॅनल

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या लोकनेते स्व. मारूतराव घुले पाटील शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, महेश निकम,गोरक्षनाथ निकम,अशोक गुंदेचा,कचरदास गुंदेचा,पमाभाऊ शिंदे,आगळे बाबा,रावसाहेब निकम,सकाहरी आगळे,खान साहेब यांनी केले.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!