भेंडा-
ज्या ज्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्या संधी चे सोनं करीत मिळालेल्या पदाला न्याय देत माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी आपले कर्तृत्व आणि कार्यक्षमता सिद्ध केली असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर उद्योग समूह,कामगार संघटना व विविध संस्थाचे वतीने आयोजित सत्कार समारंभात श्री.अभंग बोलत होते.
जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काशिनाथ नवले ,काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे,अशोकराव मिसाळ, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठलराव लंघे,कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे,मिलिंद कुलकर्णी,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.अभंग पुढे म्हणाले,आधी केले मग सांगितले असा नरेंद्र पाटलांचा शिरस्ता आहे. मारुतरावजी घुले पाटील यांचे ध्येय-विचारांचा अंगिकार करून नरेंद्र पाटलांनी काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तिचा उपयोग समाजाच्या उत्कर्षासाठी करून आपले सर्वस्व समाजहितासाठी देण्याचा निर्णय जो निर्णय घेतलेला आहे तो अभिनंदनीय आहे.शरद पवारांचा स्नेह असणाऱ्या घुले बंधूंना पुढील काळात राजकिय प्रवासात मोठे भवितव्य असल्याचे ही अभंग यांनी स्पस्ट केले.
कारखान्याचे जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,संचालक काकासाहेब नरवडे,कामगार संचालक सुखदेव फुलारी, पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री लोंढे यांनी ही मनोगत व्यक्त करून श्री. घुलेंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कारखान्याचे संचालक डॉ.नारायण म्हस्के, शिवाजी कोलते,भाऊसाहेब कांगुणे, विष्णू जगदाळे,दत्तात्रय खाटीक,
जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे, तुकाराम मिसाळ,दादासाहेब गंडाळ,गणेश गव्हाणे,अशोक वायकर ,नामदेव निकम,अमोल अभंग,अनिल मडके,घुले पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, रामभाऊ पाउलबुद्धे,भाऊसाहेब चौधरी,भानुदास कावरे,गोरक्षनाथ कापसे, कामगार संघटनेचे सहखजिनदार संभाजी माळवदे,शेतकी अधिकारी सुरेश आहेर,प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, जलसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के ,कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,विलास लोखंडे, सुनील देशमुख,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.शामसुंदर कौशिक,प्राचार्य डॉ.रामकीसन सासवडे, प्राचार्य सुरेश वाबळे, उपप्राचार्य भारत वाबळे,प्राचार्य सोमनाथ औताडे, किशोर मिसाळ आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
*वृक्षारोपण व रक्तदान शिबिर…
माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच ज्ञानेश्वर उद्योग समूह,मानवता प्रतिष्ठान व जनकल्याण रक्तपेढी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन आले.माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते व जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सुनिल देशमुख ,यशवंत पाऊलबुद्धे , भाऊसाहेब सामृत ,पोपट उगले,राजेंद्र शिंदे , डॉ.मढीकर,डॉ.झेंडे आदिंनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.
गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप...
यावेळी 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी सरपंच अशोकराव मिसाळ यांचे वतीने गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.