Thursday, June 30, 2022

मंत्री शंकरराव गडाख यांना मणक्याचा त्रास;रुग्णालयात दाखल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासाचे आमदार व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना मणक्याच्या त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या सहा रिक्त जागांसाठी आज विधानभवनात मतदान झाले. त्यासाठी ना.गडाख हे मुंबईत गेले होते.मतदानाला जात असताना त्यांना मणक्यात वेदना झाल्या. मणक्यात वेदना झाल्याने त्यांना रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या मतदानाची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू आहे. शिवसेनेचे सर्व आमदार पवई येथील वेस्टइन हॉटेलमध्ये होते. मंत्री गडाख हे मतदानासाठी गेले असता त्यांचे जुने दुखणे पुन्हा उद्भवले. त्यामुळे त्याच्या मणक्याचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे.त्यांना स्लीप डिस्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी मतदान केल्यावर ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. विधानपरिषदेचे मतदान करण्यासाठी जाताना व्हील चेअरवर गेले. तेथे सेनेचे आमदार तसेच विधानपरिषदेचे उपसभापती नरहरी झिरवळ, शिरुरचे आमदार अशोक पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी गेटवर जात गडाख यांची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांची विचारपूस करून काळजी घ्या असे सांगितले.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते इतर आमदारांचा आधार घेत विधानभवनातील मतदान केंद्रावर पोचले. तेथे त्यांनी मतदान केले. त्यानंतर ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांना पाठीचा आजार आहे. चार दिवसांपूर्वी प्रवासात मोठा जर्क बसल्याने त्रास सुरू झाला. मुंबई येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

 

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!