Thursday, June 30, 2022

महाराष्ट्रात 6 जिल्ह्यात ऑरेंज तर 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यात अखेर मान्सूनला जोरदार सुरूवात झाली आहे. कालपासून कोकणासह राज्यातील विवीध भागात जोरदार

पावसाने हजेरी लावली, काल काही काळ मुंबईत पावसाचे आगमन झाल्याने मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान

रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. मॉन्सून दाखल झाला असला तरीही पाऊस अजून स्थिरावलेला नसल्याने पेरण्या करण्याची गडबड न करण्याचे

आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. याचबरोबर हवामान विभागाकडून 6 जिल्ह्यात orange alert तर 12 जिल्ह्यांना yellow alert देण्यात आला आहे.

देशातील बहुतांश भागात अद्याप मान्सूनची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनी म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. आतापर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार खरीप लागवडीत

घट दिसून आली आहे. पेरण्यांसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागलेल्या आहेत.केरळात वेळेआधी पोचून ३१ मेपर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर

दाखल झाल्यानंतर तब्बल 10 दिवसांनी मान्सूनने कोकणात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (11 जून) बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात मान्सून दाखल झाला. 13 जून रोजी

मान्सूनने संपूर्ण कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत 16 जून रोजी मोठी मजल मारून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत गोंदियापर्यंत पावसाने हजेरी लावली.

तर रविवारी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. नियमित वेळेनुसार साधारणतः 15 जून रोजी मॉन्सून सर्व राज्यात दाखल होतो. यंदा चार दिवस उशिराने मान्सून राज्यात सर्वदूर दाखल झाला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) कोकण: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर, विदर्भ यवतमाळ, चंद्रपूर,

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!