Thursday, June 30, 2022

नगर खळबळजनक:दोन महिण्यापुर्वी झाले लग्न विवाहितेच्या चारित्र्यावर संशय;विवाहितेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच केला अंत्यविधी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने माहेरी येवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना सोमवार (दि.२०) रोजी गेवराई (ता.नेवासा) येथे

घडली आहे. संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी विवाहितेचा मृत्युदेह चक्क सासरी जावून विवाहितेच्या घरासमोर अंत्यसंस्कार केला. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात मृतक विवाहितेच्या

पतीसह सासु – सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे, की गेवराई (ता.नेवासा) येथील नानासाहेब कर्डिले यांच्या मुलीचे लग्न सामनगांव

(ता.शेवगांव) येथील सुधीर सुरेश कापरे याच्याशी दोन महिण्यापुर्वी झाले होते. लग्नात ठरल्याप्रमाणे हुंड्याच्या स्वरूपात नवरदेवाला पाच लाख रुपये, सहा तोळे सोन्याचे दागिने दिलेले होते.

दरम्यान हुंड्याचे राहिलेले एक लाख 75 हजार, सोनाराचे पैसे व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून पैसे दिले नाहीत, म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. तसेच

मृतक विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात होता.या त्रासाला कंटाळून विवाहितेने माहेरी येऊन विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान

या विवाहित मुलीचा मृत्यू झाला. नेवासा पोलीस ठाण्यात मुलीची आई अर्चना नानासाहेब कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेची सासु मुक्ताबाई कापरे, सासरा सुरेश कापरे,

नवरा सुधीर कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मृतक विवाहितेचा

मृत्युदेह तिच्या सासरी नेवून सासरच्या दारातच अग्निडाव देवून संताप व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!