Saturday, September 23, 2023

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर व सोनई महाविद्यालयांना बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स व एम एस्सी कॉम्प्युटर अप्लिकेशनला परवानगी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आग्रेसर असलेल्या मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या
नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये बी एस्सी कॉम्प्युटर सायन्स व एम एस्सी कॉम्प्युटर अप्लिकेशन कोर्सला तसेच सोनई येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये बी एस्सी कॉम्प्युटर सायन्सला नुकतीच परवानगी मिळाली आहे.

नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सदर कोर्ससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे मुळा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून व्यक्तिगत पाठपुरावा उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केला व त्यानुसार वरील कोर्सला परवानगी मिळाली आहे यामुळे बाहेरगावी जाऊन सदर कोर्सला ऍडमिशन घेताना नेवासा तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय दूर होणार असून याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
सोनई महाविद्यालयात बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स च्या 80 जागा उपलब्ध असणार आहेत तर श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात
कॉम्प्युटर सायन्स च्या 80 जागा तर एम एस्सी कॉम्प्युटर अप्लिकेशन च्या 30 जागांना परवानगी मिळाली आहे
तांत्रिक बाबींची पूर्तता झाली की लवकरच ऍडमिशन ला सुरुवात होणार असल्याची माहिती मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात आली आहे.
विशेष प्रयत्नपूर्वक कोर्सला मान्यता मिळवून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर केल्याबद्दल उपाध्यक्ष उदयन गडाख यांचे विद्यार्थी, पालकांनी अभिनंदन केले आहे.
..फोटो
उदयन गडाख …
चौकट…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची होणारी गैरसोय दूर व्हावी या हेतूने सोनई व नेवासा महाविद्यालयात नवीन कोर्सला मान्यता मिळवली आहे याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे
उदयन गडाख
उपाध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी
सोनई.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!