Friday, July 1, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात

आल्याचे वृत्त आहे. राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. या राजकीय संकटातच कोरोनाची भर पडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

यांना मुंबईतल्या रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात त्यांच्यावर कोरोनासंदर्भात उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान सध्या राज्यात राजकीय

वातावरण तापलं आहे. अशातच एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. राज्यपालांची भेट घेऊन एकनाथ शिंदे त्यांना पत्र देणार होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

दरम्यान, मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर सूरतमध्ये हालचालींना वेग आला आणि तीन वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना गुवाहाटीच्या दिशेनं हलवण्यात आलं.

विमानतळावर पोहोचताच शिंदेंना माध्यमांनी घेरलं, त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली, ‘माझ्याकडचा गट हीच खरी शिवसेना आहे’, असं म्हणत शिंदेंनी आपण बाळासाहेबांचं हिंदुत्त्वं पुढे नेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.

दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगानं वाहू लागलेत. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते.

दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!