Sunday, July 3, 2022

एकनाथ शिंदेंसोबत दिसले भाजपचे २ नेते

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून मोठा राजकीय संघर्ष निर्माण केला आहे.

३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच गुवाहाटीला दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.

एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. पण सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच गुवाहाटीला

जाण्याचा प्लॅन रचला त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलं आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून

आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय सुद्धा सोबत होते. रवींद्र चव्हाण आणि मोहित

भारतीय हे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही.

हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे.गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार यांची जबाबदारी

संजय कुटे, मोहित खंबोज, डोंबिवली आमदार चव्हाण यांच्याकडे दिली आहे.या तीन लोकांवर सर्व समन्वय आणि सोबत राहण्याच्या सूचना केल्या आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस

यांनी खास या तीन लोकांवर जबाबदारी दिली आहे.ऑपरेशन लोटस याची चर्चा रंगली आहे. कंबोज, कुटे आणि चव्हाण हे फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे शिंदे यांच्यासह

इतर आमदार फडणवीस समवेत थेट संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आज पहाटे सर्व आमदार हे गुवहाटीला पोहोचले आहे. गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये

या आमदारांना ठेवण्यात आले आहे. या हॉेटेलबाहेर मोठा सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!