माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याला प्रतिक्विंटलला 1700 रुपये इतका भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत काल 15422 गोणी कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1200 ते 1700 रुपये, कांदा नंबर 2 ला 650 ते 1150 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 600 रुपये,
गोल्टी कांद्याला 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 200 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याला 1900 रुपयांपर्यंत भाव निघाला.
शनिवारच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत जवळपास 29 हजार गोण्यांची घट झाली. एकूण 60 हजार 169 गोण्या कांद्याची आवक झाली. एक-दोन
लॉटला 1800 ते 1900 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मोठ्या कलरपत्ती कांद्याला 1300 ते 1750 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1200 ते 1350 रुपये, मिडीयम कांद्याला 800 ते 1100 रुपये,
गोल्टा कांद्याला 600 ते 800 रुपये, गोल्टी कांद्याला 200 ते 500 रुपये तर जोड कांद्याला 200 ते 650 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हलका डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.
राहुरी बाजार समितीच्या मुख्य आवारात 21063 गोण्यांची आवक कांद्याची होऊन उन्हाळ कांद्याला 100 ते दोन हजार रुपयेपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीमध्ये आलेल्या कांद्याला
सरासरी एक हजार ते सोळाशे एकनंबर, 501 ते 1000 दोननंबर तर शंभर ते पाचशे तीननंबर याप्रमाणे बाजारभाव मिळाले.तर गोल्टी कांद्याला पाचशे ते बाराशे रुपयापर्यंत भाव मिळाले.
दोन हजार रुपयांनी 11 गोण्या, 1755 रुपयांनी अकरा गोण्या, 1740 पंधरा गोण्या, 1725 एकूण वीस गोण्या तर सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत 231 गोण्या याप्रमाणे अपवादात्मक भाव निघाले.
बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात 9565 गोण्यांची आवक होऊन बाजारभाव 1200 ते 1600 एक नंबर, दोन नंबर 800 ते 1995, तीन नंबर 100 ते 795 तर गोल्टी कांद्याला
पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांबोरी उपबाजारातही अपवादात्मक गोण्यांना 1900 ते सतराशे रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.