Sunday, July 3, 2022

१४ महिन्यातच १ लाख रूपयांचे झाले ३९ लाख रूपये वाचा कसे ते….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील १४ महिन्यांत लोकांना मालामाल केले आहे. ही कंपनी EKI एनर्जी सर्व्हिसेस आहे.

या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी १६२ ते ६००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्संनी ३,५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. लक्षणीय बाब म्हणजे कंपनी

आता आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे, ज्यासाठी EKI एनर्जी सर्व्हिसेसने रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.EKI एनर्जी सर्व्हिसेस ३:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स ऑफर करत आहे.

कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख १ जुलै २०२० रोजी फिक्स केली आहे. तसेच बोनस जारी करण्याची मुदत ३० जून २०२२ आहे. EKI एनर्जीच्या शेअर्सने रुपये १२,५९९.९५ चा ५२

आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची लो-लेव्हल ६२३.५० रुपये आहे. ईकेआय एनर्जी कंपनीचे मार्केट कॅप ४३८७ रूपये आहे. EKI एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्संनी

मागील १४ महिन्यांत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. ९ एप्रिल २०२१ रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर १६२.०५ रुपयांच्या पातळीवर होते, जे २० जून

२०२२ रोजी ६३९० रुपयांच्या पातळीवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्संनी गुंतवणूकदारांना ३८४३ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ९ एप्रिल २०२१ रोजी

EKI एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर सध्याचे पैसे ३९.४३ लाख रुपये झाले असते. लक्षणीय

बाब म्हणजे कंपनीच्या शेअर्संनी गेल्या वर्षभरात ९२४ टक्के परतावा दिला आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!