Friday, July 1, 2022

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी:मुख्यमंत्र्यांनी अखेर घेतला मोठा निर्णय, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत

घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ

शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे.त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात

अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. या आमदारांना चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं आहे.

तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली बाजू फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडली. तसेच शिंदेसह भाजपला चोख उत्तर देखील दिलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे फेसबूक लाईव्हमधून म्हणाले

तुम्हाला जे वाटतं ते एकदा समोर येऊन बोला. जर तुम्हाला मी पदावर नको असेन तर तसं सांगा. मी हे पदही सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार हे त्यांच्याच पक्षातील शिवसैनिक आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी अडचणीत आणलं आहे. काही वेळापूर्वीच जनतेला संबोधन करताना मुख्यमंत्री उद्धव

ठाकरे यांनी मी आजच वर्षा बंगला सोडत असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा काही तासातच खरी ठरली आहे. त्यांनी सर्व साहित्यासह वर्षा बंगला सोडला आहे. ते त्यांच्या मातोश्री

या निवसस्थानीच आता मुक्कामी असणार आहेत. तर मला कुठल्याही आमदाराने मी मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यास सक्षम नसल्याचे सांगावे, मी एका मिनिटात राजीनामा देईल, असेही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले होते. तसेच मुख्यमंत्री बोलून गेल्यानंंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या चार मागण्या थेट ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या होत्या. यातून तर मुख्यमंत्री आणि शिंदे

यांच्यात कुठेही मेळ होताना दिसत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदही सोडणार का? असाही सवाल आता विचारण्यात येत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान

सोडून बाहेर आले, तेव्हा बाहेर उभे असलेल्या शिवसैनिकांकडून त्यांच्या पुष्पवृष्टी करण्यात आली. लाखो शिवसैनिकांसाही हा क्षण हा भावनिक होता. यावेळी मुख्यमंत्री

यांनी हात जोडत लोकांचे आभार मानले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही सुरू होती. शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याने मुख्यमंत्र्यांची गाडी या गर्दीतून वाट काढत हळू हळू पुढे सरकार होती.

यावेळी पोलीस शिवसैनिकाना हटवण्याचे काम करत होते. मात्र शिवसैनिकही तरीही मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पुष्पवर्षाव हे करतच होते.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!