माय महाराष्ट्र न्यूज:आचार्य चाणक्य हे अर्थतज्ज्ञ, राजकीयविशेषतज्ज्ञ आणि कूटनीतिज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या नीतिशास्त्राच्या जोरावर
चंद्रगुप्त मौर्य यांना संपूर्ण भारतवर्षाचा सम्राट बनवले होते. नीति ग्रंथात म्हणजेच चाणक्य नीतिमध्ये आपल्या जीवन अधिक सरळ आणि सफल बनवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत.
चाणक्य यांनी आपल्या नीति शास्त्रात करियर, मैत्री, दाम्पत्य जीवन, धन-संपत्ती आणि महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे. चाणक्य नीतिमधीय महिला आणि पुरुषांशी
संबंधित तसेच त्यांच्या अंगी असलेल्या गुणांबाबत देखील उल्लेख केला आहे. विवाह प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सुंदर अनुभव आहे. त्याबाबत देखील आचार्य चाणक्य यांनी आधीच काही गोष्टी नोंदवून ठेवल्या आहेत.
आचार्ण चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने तो किती कमवतो, त्याचा पगार किती याबाबत पत्नीला माहिती देऊ नये. काही महिला या पतीच्या उत्पन्नानुसार खर्च करतात तर काही
पतीला खर्च करण्यापासून रोखतात. अशात आवश्यक गोष्टीवर खर्च करताना पतीवर निर्बंध लादली जातात.चाणक्य सांगतात, की, आपला कुठे अपमान झाला असेल, एखाद्या वेळी कुठे
मानहानी झाली असेल तर ती बाब चुकूनही आपल्या पत्नीला सांगू नये. नंतर महिला त्या गोष्टीचं भांडवल करतात आणि वारंवार पतीला टोमणे मारतात.चाणक्य यांच्यामते, कोणत्याही
पुरुषाने आपल्या पत्नीला आपला दुबळेपणा सांगू नये. त्यावरून महिला आपल्या पतीला उलटसूलट बोलतात.चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाने
आपल्या पत्नीला आपण काय दान करतो, सामाजिक कार्यात आपलं काय योगदान आहे, याबाबत कधीही सांगू नये. पुरुषांनी गु्प्तदान करावे.