Thursday, June 30, 2022

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:जागतिक तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. अशातच सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे

 

नवे दर जाहीर केले आहेत. आजच्या दरानुसार कंपन्यांना दीर्घ काळानंतर ब्रेंट क्रूड जागतिक बाजारात ११० डॉलरपेक्षा स्वस्त झालं आहे.जागतिक बाजारात, ब्रेंट क्रूडची किंमत आज

सकाळी प्रति बॅरल १०९.७ डॉलर अशी आहे तर US क्रूड WTI ची किंमक प्रति बॅरल सुमारे १०४ डॉलर अशी आहे. सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असला

तरिही आज या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले असून दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.दरम्यान, एप्रिल महिन्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ

किंमतींमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, क्रूडने गेल्या आठवड्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे १० % घसरण केली आहे. त्यामुळे आता तेलांच्या किंमती घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल १११.३५ रुपये तर डिझेल ९७.२८ रुपये प्रति लिटर. दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर तसंच चेन्नईत

पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर, असे दर आहेत.दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.

 

तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासाठी

 

इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल

ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!