भेंडा
अल्पावधीत सहकार क्षेत्रात नावारूपास आलेल्या भेंडा येथील लोकसेवक महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने अवघ्या सतरा महिन्याच्या कालावधीत १ कोटी ५० लाखांच्या ठेवीचा टप्पा पुर्ण केला आहे.
ठेवीदार, कर्जदार, सभासदांचे सहकार्य व विश्वासावर पतसंस्थेची वाटचाल सुरु आहे. सर्वसामान्यांसाठी भक्कम पाठबळ देणारी व एक आधारवड बनलेली हि पतसंस्था नवउद्योजकांसाठी आशेचा किरण बनलेली आहे. भेंडे व पंचक्रोशीतल्या अर्थकारणाला गती आणि बळकटी देण्याचे काम लोकसेवक पतसंस्था करीत आहे. नेवासा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात मात्र सतरा महिन्याच्या कालावधीतच दिड कोटींच्या ठेवी पूर्ण केलेली लोकसेवक महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था भेंडा तालुका नेवासा खातेदारांच्या विश्वासास पात्र ठरली असल्याची माहिती पतसंस्थेच्या चेअरमन तथा सौंदाळा गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियंका शरदराव अरगडे यांनी दिली आहे.
पतसंस्थेची ३१ मे २०२२ अखेर सभासद संख्या ७२१ इतकी असुन सभासद भागभांडवल १० लाख ३२ हजार असुन १२ लाख १० हजार एवढा स्वनिधी आहे. पतसंस्थेकडे १ कोटी ५१ लाखाहून अधिकच्या ठेवी आहेत. संस्थेने ३२ लाख रुपयाची गुंतवणूक केली आहे. महिला बचत गट, छोटे व्यावसायिक, सोनेतारण अश्या विविध माध्यमातून पतसंस्थेने १ कोटी ९९ हजार चे कर्ज वाटप केले आहे
लोकसेवक महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चेअरमन, सर्व संचालक मंडळ व सचिव यांनी सर्वप्रथम सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार व हितचिंतक यांचे आभार मानले.
लोकसेवक पतसंस्थेने कमी कालावधीत जनतेचा विश्वास संपादन करून प्रगतीकडे वाटचाल केल्याबद्दल नामदार श्री.शंकरराव गडाख पाटील, ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे चेअरमन नरेंद्र घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी अभिनंदन केले.