Saturday, July 2, 2022

मंत्री गडाख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबतच ; महाराष्ट्रातून होत आहे जोरदार कौतुक 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदार तर काही मंत्रीही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत.

त्यामुळे अशाच पद्धतीने पाठिंबा दिलेले आणि मंत्रीपद मिळालेले शंकरराव गडाख सध्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गडाख आजारी

असल्याने मुंबईतील घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र, ते शिंदे यांच्या गटासोबत नसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात येते. असे असेल तरी आजारपणामुळे सध्या ते ठाकरे

यांच्याकडील बैठकांनाही जाऊ शकत नसल्याचे सांगण्यात येते.शंकरराव गडाख नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांनी आपल्या क्रांतिकारी

शेतकरी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढविली होती. भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा त्यांनी पराभव केला होता. महाविकास आघाडीची स्थापना होण्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेला

पाठिंबा दिला. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पुढाकारतून गडाखांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. पुढे महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.

त्यामुळे या बंडोखोरीच्या पार्वभूमीवर गडाख काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. मात्र, अशा कसोटीच्यावेळी ते आजारी आहेत. विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने

जात असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लीप झाली. त्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. तशाही अवस्थेत त्यांनी मतदान केले आणि थेट रुग्णालय गाठले. त्यानंतर काही वेळातच

बाहेर या राजकीय घडामोडी सुरू झाल्या. तेव्हा गडाख रुग्णालयात होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र पुढील पंधरा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

त्यामुळे सध्या ते मुंबईतच विश्रांती घेत आहेत. ते ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आजारपणामुळे बैठकांना उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!