माय महाराष्ट्र न्यूज:खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळाडू त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगल्या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतो / दिसते. जीममध्ये घाम गाळणं असो, खाण्यापिण्याच्या
सवयींवर लक्ष देणं असो किंवा मग शारीरिक क्षमतेची चाचणी घेणारी कामं असो. हे खेळाडू त्यांच्या या परीक्षांपासून मागे हटत नाहीत. एक खेळाडू मात्र असा आहे, जो चांगल्या प्रदर्शनासाठी जे
काही करतो ते बहुधा कुणी करत नसावं. त्याच्या पत्नीनंच याबाबतचा खुलासा केला आहे. एका युट्यूब शोदरम्यान तिनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांनाच धक्का बसला. बास्केटबॉलपटू जेनिस टिम्मा
याच्या पत्नीनं हल्लीच एका युट्यूब शोदरम्यान, लग्न आणि खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं. इतक्या व्यग्र वेळापत्रकातही तू आणि पती एकमेकांना वेळ कसा देता? असा प्रश्न केला असता जेनिसची
पत्नी, अॅना सेदकोवा हिनं जरा स्पष्टच उत्तर दिलं. आमच्यात 15 मिनिटं नव्हे, 2 तास शारीरिक संबंध असतात, हे खरंय. यामुळं टिम्माला खेळात चांगलं प्रदर्शन करण्यासाठी मदत होते.
कारण तो मानसिकदृष्ट्या सक्षम असतो’, असं ती म्हणाली. कधीकधी मला वाटतं की हे सर्व (सेक्स) 15 मिनिटांतच संपावं, पण ते किमान 2 तास सुरुच असतं, असंही तिनं सांगितलं.