नेवासा
चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी सकाळी 8 वाजत नेवासा बुद्रुक शिवारातील येथील पवार वस्तीजवळ घडली आहे.
याबाबत मिरजा अजाझ बेग इकबाल बेग (वय 38 वर्ष) धंदा- फळे खरेदी विक्री रा. मोहल्ला कमान खुलताबाद ता. खुलताबाद जि. औरंगाबाद याने
नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दि. 24/06/2022 रोजी सकाळी 06 वाजेचे सुमारास मी, आमीन युसुफ पठाण, मिर्झा खलील छोटु बेग, असे पुढील बाजुस बसलेलेल होता व मागील बाजुस लेबर कामगार मिर्झा शाकीर बेग युनुस बेग, मिर्झा जहीर बेग छोटु बेग, इम्रान शेख,मिर्झा फाईझ फरिद बेग, मिर्झा फरदीन बेग (सर्व रा. खुलताबाद जि. औरंगाबाद), सोयल सलीम शेख, मुक्तार शेख एहमद शेख , शेख इब्राहीम शेख (सर्व रा. दौलाताबाद ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) असे आम्ही भाऊ मिर्झां इलीयास इकबाल यांचे मालकीची असलेली टाटा कंपनिची 407 टेम्पो क्र. MH- 46 E-0669 असे टेम्पोमध्ये बसुन खुलताबाद जि. औरंगाबाद येथुन पुनतगाव येथील डॉ. शेळके रा. श्रीरामपुर यांचे नेवासा बुद्रुक शिवारातील फळबाग तोडणेकरीता नेवासा बुद्रुक ते पुनतगाव रोडने जात असताना त्यावेळी सदरची गाडी ही आमीन युसुफ पठाण हा भरधाव वेगात टोम्पो चालवित होता.
आमचा टेम्पो सकाळी 08 वाजेचे सुमारास नेवासा बुद्रुक शिवारातील शंकर भाऊराव पवार यांचे वस्तीसमोरील डांबरी रस्त्याने जात असताना डांबरी रस्त्यावर चिखल असल्याने सदरची गाडी स्लिप होवुन चालक आमीन युसुफ पठाण यांचे हातुन टेम्पोचा तोल जावुन गाडी अचानक उजवे बाजुने पल्टी झाल्याने गाडीचा अपघात झाला आहे.
त्यामध्ये क्लिनर साईटने बसलेला मिर्झा खलील छोटु बेग हा गाडीचे खाली दबला गेल्याने त्याचे डोक्यास व तोंडावर जबर दुखापत होवुन तो बेशुद्ध पडल्याने तसेच मला व टेम्पोचालक आमीन युसुफ पठाण यास मुका मार लागून दुखापत झाल्याने मी 108 ला कॉल करुन सदर घटना ठिकाणी अॅम्बुलन्सला बोलावुन घेतली. आम्ही अॅम्बुलन्समध्ये बसुन ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे उपाचारकमी गेलो तेथे डॉक्टरांनी मिर्झा खलील छोटु बेग यास तपासले असता तो मयत असल्याचे सांगीतले.
व वर नमुद आठजण हे गंभीर जखमी झाले आहेत.
चालक आमीन युसुफ पठाण यांने त्याचे ताब्यातील टेम्पो हयगयीने भरधाव वेगाने चालवुन रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, टेम्पो उजवे बाजुने पल्टी करुन डावे बाजुस बसलेला मिर्झा खलील छोटु बेग (वय-56 वर्ष) हा टेम्पोखाली दबला गेल्याने त्याचे डोक्यास व तोंडावर गंभीर मार लागुन त्यास गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे व इतरांचे गंभीर दुखापतीस कारणीभुत झाला आहे या आरोपावरून टेंपो चलकाविरुद्ध
नेवासा पोलिस ठाण्यात गु र नंबर 532/22 भादवी कलम 279,304(अ),337,338,427 तसेच मोटार वाहन कायदा 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक विजय करे यांचे मार्गर्दशनावाखाली पोलिस नायक तमनर पुढील तपास करत आहे.