Wednesday, August 17, 2022

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून
नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबद नेवासाचे तहसीलदार रुपेशकुमार विजयलाल सुराणा (वय 41 वर्ष) यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,नेवासा तहसिल मार्फत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकरी यांना महाराष्ट्र शासनाकडुन लाभार्थी यांना आर्थिक मदत धनादेशादवारे मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे कडील आदेश क्र. आव्यमपु/कार्या 19अ/ 1625/2019 दिनांक 20/11/2019 व अनुषांगिक आदेशान्वये वितरीत करण्यात येत असतात. त्यानुसार तहसिल कार्यालयात नैसर्गिक आपत्ती / टंचाई संकलनाचे कामकाज हे दिनांक 03/02/2014 ते 27/08/2020 या कार्यकाळात श्री. राजेंद्र दगडु वाघमारे, महसुल सहाय्यक दिनांक 27/08/2020 ते 15/09/2021 या कार्यकाळात श्री. तुकाराम एल तांबे, महसुल सहाय्यक, दिनांक 15/09/2021 ते आज पावेतो श्री. मनोहर ए. डोळस, महसुल सहाय्यक व श्री. धिरज साळवे, अव्वल कारकुन जमिन हे पाहत आहेत.

सदर योजनेच्या अनुषंगाने तहसिल कार्यालयाचे अंतर्गत वेगवेगळया सजा व गावचे तलाठी हे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी/ टंचाई च्या अनुषंगाने नुकसान ग्रस्त शेतक-याचे शेताचे पंचानामे करुन त्यानुसार यादी सादर करित असतात सदर प्राप्त यादीच्या अनुषंगाने संबंधीत कामकाज पाहणारे महसुल सहाय्यक व अव्वल कारकुन हे दोघेजन यादीत नमुद केलेनुसार शेतकरी निहाय / बॅक निहाय धनादेश तयार करुन सदर धनादेशाचे संबंधित खातेदारांच्या बँके खात्यात रक्कम वर्ग करणेकामी सदरचे धनादेश बँकेत जमा करण्याकरिता संबंधीत गावचे तलाठी व कोतवाल यांचे कडेस दिले जातात.

त्यानुसार देडगाव या गावातील लाभार्थी शेतक-यांचे धनादेश श्री. राजेंद्र दगडु वाघमारे, महसुल सहाय्यक यांनी देडगावचे कोतवाल नामे अविनाश हिवाळे यांना बोलावुन सदरचे धनादेश बँकेत जमा करणेबाबतच आदेश दिले होते त्यावरुन संबंधित कोतवाल अविनाश हिवाळे यांनी देडगाव गावाचे धनादेश बँकेत जमा करणेकामी ताब्यात घेतले होते.
तसेच काही धनादेश कोतवाल नामे अविनाश हिवाळे याने जेऊर हैबती येथील कोतवाल नामे राजु इनामदार यास घेऊन येणे बाबत कळविले व त्यानुसार काही धनादेश हे राजु इनामदार करवी प्राप्त करुन घेतले तर काही धनादेश हे स्वतः तहसिल कार्यालयात येऊन प्राप्त करण्यात आले.

त्यावरुन सदर रजिष्टर

1. अ.क्र. 128 एच.डी.एफ.सी पुणे या बॅकेचे नावे धनादेश क्र. 070913 दिनांक 11/03/2020 रक्कम रुपये 800/- अशा प्रकार देणेत आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करून त्यातील अ.क्र. 128 चे धनादेश हा एच.डी.एफ.सी पुणे बॅकेच्या नावे देणेत आला होता. त्यामध्ये बँकेचे नाव ऐ. डी. सी. सी. बॅक कुकाणा असे खाडाखोड करुन व रक्कम रुपये 165800/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 25/09/2021 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविणेसाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात आला.

2.अ.क्र. 131, नगर अर्बन बँक शाखा कुकाणा या बँकेचे नावे धनादेश क्र. 070916 दिनांक 11/03/2020 रक्कम रुपये 1600/- अशा प्रकार देणेत आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन रक्कमे मध्ये खाडाखोड करुन त्यातील अ.क्र. 131 चे धनादेश हा नगर अर्बन बँक शाखा कुकाणा नावे देणेत आला होता. त्यामध्ये रक्कम रुपये 297452/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 24/03/2021 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविणेसाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड करुन बँकेमध्ये जमा करण्यात आला.

3.अ.क्र. 132, बॅक ऑफ बडोदा शाखा भेंडा या बॅकेचे नावे धनादेश क्र. 070917 दिनांक 11/03/2020 रक्कम रुपये 65720/- अशा प्रकारे देणेत आलेला धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न परस्पर यादी मध्ये बदल करुन दिनांक 25/03/2022 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन त्यातील अ.क्र. 132 चे धनादेश हा बॅक ऑफ बडोदा शाखा भेंडा नावे देणेत आला होता. सोबत जोडलेल्या लाभार्थी यादीत बदल करुन नामे 1) प्रविण उत्तमराव बागडे यांचा खातेक्रमांक 11298100010683 यावर रक्कम रुपये 50000/- बेकायदेशिरपणे वळवण्यात आली. 2) दयानंद सुर्यभान जाधव यांचा खातेक्रमांक 11290100019922 यावर रक्कम रुपये 15720/- बेकायदेशिरपणे वळवण्यात आली.

4.अ.क्र. 133 बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अहमदनगर या बॅकेचे नावे धनादेश क्र. 070918 दिनांक 11/03/2020 रक्कम रुपये 1200/- अशा प्रकार देणेत आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करुन त्यातील अ.क्र. 133 चे धनादेश हा एच.डी.एफ.सी पुणे बँकेच्या नावे देणेत आला होता. त्यामध्ये बॅकेचे नाव बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा रेल्वे स्टेशन औरंगाबाद असे खाडाखोड करुन व रक्कम रुपये 195712/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 25/03/2022 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविणेसाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात आला.

5.अ.क्र. 134, बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा कुकाणा या बँकेचे नावे धनादेश क्र. 070919 दिनांक 11/03/2020 रक्कम रुपये 26700/- अशा प्रकारे देणेत आलेला धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न परस्पर यादी मध्ये बदल करुन दिनांक 16/03/2022 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन त्यातील अ.क्र. 134 चे धनादेश हा बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा कुकाणा नावे देणेत आला होता. सोबत जोडलेल्या लाभार्थी यादीत बदल करुन नामे 1) अतुल अविनाश हिवाळे यांचा खातेक्रमांक 60257278829 यावर रक्कम रुपये 26700/- बेकायदेशिरपणे वळवण्यात आली.

6.अ.क्र. 416 इंडियन बँक शाखा अहमदनगर या बॅकेचे नावे धनादेश क्र. 070898 दिनांक 11/03/2020 रक्कम रुपये 800/- अशा प्रकार देणेत आलेला धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करुन त्यातील अ.क्र. 416 चे धनादेश हा इंडियन बँक शाखा अहमदनगर बँकेच्या नावे देणेत आला होता. त्यामध्ये बँकेचे नाव ऐ. डी. सी. सी. बॅक कुकाणा असे खाडाखोड करून व रक्कम रुपये 195725/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 13/07/2021 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविणेसाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात आला.

7.अ.क्र. 968 बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा पुणे या बँकेचे नावे धनादेश क्र. 69039 दिनांक 21/12/2019 रक्कम रुपये 3600/- अशा प्रकार देणेत आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करुन त्यातील अ.क्र. 968 चे धनादेश हा बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा पुणे बँकेच्या नावे देणेत आला होता. त्यामध्ये बँकेचे नाव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सावेडी, अहमदनगर असे खाडाखोड करुन व रक्कम रुपये 225751/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 25/04/2022 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविणेसाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात आला.

8.अ.क्र. 969 महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा बीड या बँकेचे नावे धनादेश क्र. 69040 दिनांक 21/12/2019 रक्कम रुपये 6000/- अशा प्रकार देणेत आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करुन त्यातील अ.क्र. 969 चे धनादेश हा महाराष्ट्र ग्रामिण बॅक शाखा बीड बँकेच्या नावे देणेत आला होता. त्यामध्ये बॅकेचे नाव महाराष्ट्र बॅक शाखा शेवगाव असे खाडाखोड करुन व रक्कम रुपये 217412/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 29/04/2022 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविणेसाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात आला

9.अ.क्र. 973 स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा सावेडी या बॅकेचे नावे धनादेश क्र. 69044 दिनांक 21/12/2019 रक्कम रुपये 2400/- अशा प्रकार देणेत आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा

बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करुन त्यातील अ.क्र. 973 चे धनादेश हा स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा सावेडी बँकेच्या नावे देणेत आला होता. त्यामध्ये बॅकेचे नाव बॅक ऑफ महाराष्ट्र बँक शाखा सावेडी असे खाडाखोड करुन व रक्कम रुपये 224512/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 29/04/2022 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविणेसाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात संबंधित बॅकेचे मॅनेजर व कॅशिअर यांनी कोणतीही खातरजमा न करता परस्पर सदरचे धनादेश हे कोतवाल नामे अविनाश हिवाळे यांचे सुचनेनुसार
ऐ.डी.सी.सी कुकाणा टाऊन बँकेतील खातेधारक नामे

1) श्री. रामनाथ दत्तु गोयकर यांचा खातेक्रमांक 4235 यावर रक्कम रुपये 23685/- इतकीबेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.
2) श्री. विश्वास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 8103 यावर रक्कम रुपये 24685/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

3) श्रीम. अलका चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 3414 यावर रक्कम रुपये 15625/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

4) श्री. विकास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 8099 यावर रक्कम रुपये 25685/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

5) श्री. चंद्रभान नाना हिवाळे यांचा खातेक्रमांक 3129 यावर रक्कम रुपये 26187/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

ऐ.डी.सी.सी देवगाव बँकेतील खातेधारक नामे

1) श्री. आशोक सुर्यभान जाधव यांचा खातेक्रमांक 2637 यावर रक्कम रुपये 23685/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

2) श्री. सुर्यभान सदाशिव जाधव यांचा खातेक्रमांक 1432 यावर रक्कम रुपये 26188/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

ग. नगर अर्बन बॅक शाखा कुकाणा बँकेतील खातेधारक नामे

1) श्री. विश्वास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 4712 यावर रक्कम रुपये 92481/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

2) श्रीम. सविता अविनाश हिवाळे यांचा खातेक्रमांक 5915 यावर रक्कम रुपये 94218/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

3) श्री. फकिरचंद तुकाराम हिवाळे यांचा खातेक्रमांक 6199 यावर रक्कम रुपये 26241/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

4) श्री. अविनाश चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 3782 यावर रक्कम रुपये 84512/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

घ. बॅक ऑफ बडोदा शाखा भेडा बँकेतील खातेधारक नामे

1) श्री. प्रविण उत्तमराव बागडे यांचा खातेक्रमांक 11298100010683 यावर रक्कम रुपये 50000/

इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

2) श्री. दयानंद सुर्यभान जाधव यांचा खातेक्रमांक 11290100019922 यावर रक्कम रुपये 15720/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

च. बॅक ऑफ महाराष्ट्र रेल्वे स्टेशन औरंगाबाद बँकेतील खातेधारक नामे

1) श्री. रफिक गणी सैयद यांचा खातेक्रमांक 60398788320 यावर रक्कम रुपये 195712/- इतकी

बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

छ. बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा कुकाणा बँकेतील खातेधारक नामे

1) श्री. अतुल अविनाश हिवाळे यांचा खातेक्रमांक 60257278829 यावर रक्कम रुपये 26700/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

ज. ऐ.डी.सी.सी. मार्केट यार्ड शाखा शेवगाव बँकेतील खातेधारक नामे 1) श्री. राहुल भगवान निकाळजे यांचा खातेक्रमांक 8077 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी

बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

2) श्री. भाऊसाहेब साहेबराव भोसले यांचा खातेक्रमांक 18026 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

झ. ऐ.डी.सी.सी. शाखा देवगाव बँकेतील खातेधारक नामे 1) श्री. आशोक सुर्यभान जाधव यांचा खातेक्रमांक 2637 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी

बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

ट. ऐ. डी. सी. सी. टाऊन शाखा कुकाणा बँकेतील खातेधारक ना

1) श्री. विठठल रामभाऊ कोलते यांचा खातेक्रमांक 451 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी

बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

2) श्री. चंद्रभान नाना हिवाळे यांचा खातेक्रमांक 3129 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

3) श्री. विकास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 8099 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

4) श्री. विश्वास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 8103 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

(5) श्रीम. अलका चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 3414 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी

बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे. ठ. बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सावेडी अहमदनगर बँकेतील खातेधारक नामे

1) श्रीम. हर्षदा अनिल गायकवाड यांचा खातेक्रमांक 68022669119 यावर रक्कम रुपये 225751/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

2) श्री. अनिल नारायण गायकवाड यांचा खातेक्रमांक 60291056101 यावर रक्कम रुपये 224512/

इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

ड. बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा शेवगाव बँकेतील खातेधारक नामे

1) श्री. नानासाहेब लक्ष्मण घुले यांचा खातेक्रमांक 60348507360 यावर रक्कम रुपये 217412/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे.

अशा प्रकारे तालुक्यातील देडगावचे लाभार्थी शेतक-यांचे एकुण 108820 रकमेचे एकुण 09 धनादेश मध्ये खाडाखोड करुन व बँकेचे नाव बदलुन रक्कमे मध्ये छेडछाड करुन व आमचे कार्यालयाचा बनावट शिक्का व खोटी सही करुन शासनाचे निधीतील एकुण रक्कम रुपये 1614784/- रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन संबंधित कोतवाल नामे श्री अविनाश हिवाळे यास बोलावुन विचारणा केली असता त्याने करण्यात आलेल्या अपहराबाबत धनादेशातील वाढविणेत आलेल्या रकमा व बँकेचे नावातील खाडाखोड तसचे त्याचे स्वतःचे च इतर संपर्कातील व्यक्तींच्या नावे वर नमुद केलेल्या बँकेतील खात्यात रक्कम वळविणेत आल्याचे कबुल करुन सदर अपहारीत रकमेचा भरणा करतो व मला वेळ देणेत यावा अशी विनंती केल्याने त्यास दोन दिवसाचा अवधि देणेत आला. त्यानुसार त्याने रक्कम रुपये 890103/- इतकी रकमेचा निधी हा शासनाचे खाते क्रमांक 60346687832 खात्यावर भरणा केला, परंतु उर्वरीत रक्कम रुपये 724681/- रक्कम भरण्याचे टाळण्यात आले त्यावरुन एकुण 1614784/- अपहरीत रकमेचा अपहार केला असुन शासनाचे नुकसान करण्यात आले.

तरी सदरचे धनादेश हे डिसेंबर 2019 ते आज पावेतो या कालावधीत टंचाई संकलनाचे कामकाज पाहणारे श्री. राजेंद्र दगडु वाघमारे महसुल सहाय्यक, श्री. तुकाराम एल तांबे महसुल सहाय्यक, श्री. मनोहर ए. डोळस महसुल सहाय्यक व श्री. धिरज साळवे अव्वल कारकुन यांचे कार्यकाळात वाटप करण्यात आलेले व वितरणाकरीता देडगावचे कोतवाल नामे अविनाश हिवाळे यांना देण्यात आले असता त्यांनी स्वतःचे पदाचा गैरवापर करुन स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता नुकसान ग्रस्त लाभार्थी शेतक-यांना वितरीत धनादेशाचे वाटप न करता सदर धनादेशामध्ये बॅकेच्या नावात खाडाखोड करुन रक्कमेमध्ये वाढ करुन तसेच तहसिलदार नेवासा यांचे बनावट शिक्याचा वापर करुन व बनावट व खोटी सही करुन एकुण 1614784/- इतक्या रक्कमेचा अपहार करुन शासनाचे नुकसान केले म्हणुण कोतवाल नामे अविनाश हिवाळे यांचे विरोधात कायदेशिर फिर्याद आहे.या फिर्यादी वरून कोतवाल अविनाश हिवाळे यांचे विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!